Marathi News> भारत
Advertisement

चॅलेंज आहे अशी परेड कधी पाहिली नसेल, 'ढल गया दिन' गाण्यावरची ही हटके परेड एकदा पहाच

नागालँड इथल्या जवानांनी नेहमीपेक्षा थोड्या हटके अंदाजात परेड केली आहे. या परेडमध्ये जवान ‘ढल गया दिन हो गई शाम’ या बॉलीवूडच्या प्रसिद्ध गाण्यावर परेड करत आहेत. 

चॅलेंज आहे अशी परेड कधी पाहिली नसेल, 'ढल गया दिन' गाण्यावरची ही हटके परेड एकदा पहाच

मुंबई : भारतीय जवानांच्या शौर्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या जवानांचा एक हटके व्हिडिओ व्हायरल होत असून लोकांनाही या व्हिडिओला भरपूर पसंती दिली आहे.

नागालँड इथल्या जवानांनी नेहमीपेक्षा थोड्या हटके अंदाजात परेड केली आहे. या परेडमध्ये जवान ‘ढल गया दिन हो गई शाम’ या बॉलीवूडच्या प्रसिद्ध गाण्यावर परेड करत आहेत. एक जवान ‘ढल गया दिन’ हे गाणं गातोय तर सर्व जवान एका तालात त्याला साद घालत परेड करत आहेत.

हा व्हिडीओ आयपीएस ऑफिसर रूपिन शर्मा यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.  ‘ढल गया दिन हो गई शाम, जाने दो, जाना है. आगे जाकर क्या करोगे, पीछे मुड़.” असे हटके कॅप्शन देखील या व्हिडिओला दिलं आहे.

आतापर्यंत १८ हजार लोकांनी हा व्हिडीओ पहिला असून, अनेकांनी शेअर देखील केला आहे.

Read More