Marathi News> भारत
Advertisement

स्टंट करण्यासाठीही ट्रक ड्रायव्हरनं शोधून काढला जुगाड... काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ एकदा पाहाच

या व्हिडिओमध्ये ट्रक चालवताना एक ट्रक ड्रायव्हर सीटवरून उठतो आणि हवेत स्टंटबाजी करू लागतो.

स्टंट करण्यासाठीही ट्रक ड्रायव्हरनं शोधून काढला जुगाड... काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ एकदा पाहाच

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला बऱ्याचदा असे धक्कादायक स्टंटचे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्या हृदयाचा ठोका चूकवतात. परंतु या स्टंट करणाऱ्यांना मात्र आपल्या जिवाची काहीही पर्वा नसते. ते आपले बिंधास्त स्टंट करतात. बऱ्याचदा असे स्टंट या लोकांच्या जिवावर बेततात, तर काही स्टंटमुळे होणारे नुकसान लोकांना आयुष्यभर भोगावे लागतात. तर काही जण हा स्टंट करण्यासाठी असा काही पर्याय शोधून काढतात की, त्याला तोड नसतो. आता सोशल मीडियावर या स्टंटचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये ट्रक चालवताना एक ट्रक ड्रायव्हर सीटवरून उठतो आणि हवेत स्टंटबाजी करू लागतो, जे पाहून तुम्ही तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल. परंतु जेव्हा तुम्ही हा संपूर्ण व्हिडीओ पाहाल, तेव्हा मात्र तुम्हाला यामागील एक अशी गोष्ट कळेल, ज्यामुळे तुम्हाला यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे कळणार नाही.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ट्रक चालवताना दिसत आहे. दुसऱ्याच क्षणी ती व्यक्ती आपली जागा सोडते आणि दरवाजातून पाहू लागतो. यानंतर, तो दाराला लटकतो आणि स्टिअरिंग सोडून नाचू लागतो. हा व्हिडीओ पाहून तुमची धकधक वाढेल, परंतु या हा व्यक्ती मात्र आपलं स्टंट करतच राहातो. त्याचं हे वागणं पाहून तुम्ही विचार करु लागाल की, काय हा मुर्खपणा लावलाय? याला आपल्या जिवाची पर्वा नाही का?

परंतु तेवढ्यात या स्टंट मागचं एक धक्कादायक सिक्रेट समोर येतो. जे पाहून तुम्हाला धक्का बसेल. खरंतर हा ट्रक एका दुसऱ्या गाडीच्यामागे, टो करण्यात आला आहे. ज्यामुळे या ट्रकचा कंट्रेल या व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीच्या हातात नाही. तर समोर टो करणाऱ्या गाडीच्या हातात आहे. ज्यामुळे या व्यक्तीला हा स्टंट करणं शक्य झालं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओचा असा शेवट पाहून तुम्हाला ही हसू येऊ लागले. सोशल मीडियावर युजर्सला हा व्हिडीओ फारच आवडला आहे. लोकांनी या व्हिडीओला आपल्या मित्रांसोबत देखील शेअर केला आहे.

Read More