Marathi News> भारत
Advertisement

Styling Tips: Ganeshotsav साठी साडी कोणती नेसावी असा प्रश्न पडलाय? मग 'हा' आहे पर्याय

तेव्हा काळजी करू नका हे स्टाईलिंग टीप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील. 

Styling Tips: Ganeshotsav साठी साडी कोणती नेसावी असा प्रश्न पडलाय? मग 'हा' आहे पर्याय

Saree Styling Tips: गणेशोत्सव आता जवळ आला आहे. साडी ही गणेशोत्सवाला हमखास नेसली जाते त्यातून त्यातही रेशमी, काठपदराची साडी असेल तर कुणालाही ती परिधान करायला आवडतेच. 

साडी नेसणे हा बहुतेक मुलींचा छंद असतो. साडी ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. साडीला पूर्वी फक्त एथनिक वेअर म्हणून पाहिले जायचे. पण आता वेगवेगळ्या फॅशन स्टाइलमध्ये साडी नेसली जात आहे.

साडी नेसायला अनेकांना आवडते पण त्यांना कोणती स्टायलिश साडी नेसायची याची पटकन कल्पना येत नाही. त्याबाबतीत मुली खुप गोंधळून जातात. तेव्हा काळजी करू नका हे स्टाईलिंग टीप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील. 

- अनेक स्त्रिया काठपदराच्या साड्याही आवडतात तर त्यावर तुम्ही साऊथ इंडियन स्टाईल नेकलेस आणि इयरिंग्स घालू शकता. 

- कांजिवरमच्या साड्या तुम्ही गणेशोत्सवात नक्की वापरा. 

- पारंपारिक आणि आधुनिक लुक हवा असेल तर जीन्सवर रेशमाच्या फॅब्रिकचे किंवा डिझायनर कुर्ते घालू शकता. 

- तुम्ही कोणतीही हलकी किंवा फुलांची साडी एका सॉलिड कलरच्या जॅकेटसोबत जोडू शकता. या लूकमध्ये तुम्ही खूप स्टायलिश दिसाल. तुम्हाला हवे असल्यास साडीसोबत लाँग एथनिक जॅकेटही एकत्र करू शकता.

- तुम्ही तुमच्या साडीसाठी डिझायनर ब्लाउज शोधत असाल तर डीप व्ही-नेकलाइन असलेले ब्लाउज तुमच्यासाठी योग्य आहेत. 

- जर तुम्हाला कॉटन किंवा खादीची साडी निवडत असाल तर तीही तुम्ही नक्कीच परिधान करू शकता.

- तुम्ही जॉर्जेट किंवा शिफॉनची साडीही फेस्टिवल घालू शकता. 

Read More