Marathi News> भारत
Advertisement

या २ मधमाशा या बाटलीचं झाकण उघडू शकतील का? पैज लावा

गोड खाण्यासाठी काय पण म्हणत या मधमाशा कामाला लागल्या.

या २ मधमाशा या बाटलीचं झाकण उघडू शकतील का? पैज लावा

मुंबई : फॅन्टा, माझा, कोला, स्प्राईट हे कोणाला प्यायला आवडत नाही? हे सगळ्यांचेच आवडीचे प्येय आहे. त्यात आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने जर कोणत्याही व्यक्तीसमोर थंड पेय ठेवले. तर कोणीही स्वत:ला ते पिण्यापासून थांबवू शकणार नाही, त्याला ते प्यायची इच्छा होणारच. मग त्यात या मधमाशा तरी कशा बरं मागे राहतील? त्यात गोड म्हणजे त्यांचा आवडीचा विषय. मग काय? गोड खाण्यासाठी काय पण म्हणत या मधमाशा कामाला लागल्या.

इथे दोन हाताचा वापर करुन आपल्याला कधी कधी बाटलीचे झाकण उघडत नाही. परंतु या छोट्या मधमाशांनी मात्र थोडयाशा युक्तीने आणि थोड्या मेहनतीने कामचं फत्ते केलं. म्हणजे या दोन्ही मधमाशांनी मिळून या फन्टाच्या बाटलीचे झाकण उघडले.\

Buitengebieden नामक ट्वीटर हँडलने त्याच्या ट्वीटर अकाउंटवर हा व्हीडिओ शेअर केला आणि तो काही क्षणांतच व्हायरल झाला. या व्हीडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कसे या दोन्ही मधमाशांनी हळूहळू बाटलीचे झाकण वरच्या दिशेला ढकलूऩ आणि गोल फिरवून त्याला खोललं. परंतु हे खरोखरंच आश्चर्यकारक आहे.

लोकांना हा व्हिडीओ इतका आवडला की, त्यांनी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणावर शेअर आणि लाईक केले आहे. तसेच लोकं प्राणी आणि पक्षांच्या युक्तीला आणि बौद्धिक क्षमतेलाही हा दाद देत आहेत.

Read More