Marathi News> भारत
Advertisement

महिलांनी मेट्रोमध्ये केलं असं काम, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड समोर येतात. जे अनेक लोक फॉलो करत असतात.

महिलांनी मेट्रोमध्ये केलं असं काम, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड समोर येतात. जे अनेक लोक फॉलो करत असतात. सध्या मेट्रोमध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट करण्याचा ट्रेंड आहे. अशा परिस्थितीत एक व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिला साडीत आणि घुंगटमध्ये जबरदस्त नाचताना दिसत आहेत.

मेट्रोमध्ये अनेक प्रकारचे प्रवासी तुम्ही पाहिले असतील. पण अशा महिला तुम्ही क्वचितच पाहिल्या असतील ज्या निर्भयपणे नाचताना दिसतात. लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतील याची त्यांना पर्वा नाही, ते फक्त त्यांच्या नृत्याचा आनंद घेत आहेत. आधी तुम्ही हा व्हिडीओ पाहा...

डान्सने लोकांची मनं जिंकली

या दोन महिलांना नाचताना पाहून प्रवासीही खूप खुश दिसत आहेत. प्रवाशांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. दोन्ही महिला साडीतही जबरदस्त डान्स करत होत्या. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे मनोरंजन होत आहे. प्रवाशांनाही नवीन काही पाहायला मिळाले. तर काही लोकांनी मेट्रोच्या आत नाचण्यावरही आक्षेप घेतला.

काही लोकांनी महिलांच्या डान्स स्टेप्स रेकॉर्ड करण्यासाठी त्यांचे व्हिडीओही बनवले. अशातच मेट्रोमध्ये डान्स करतानाचे व्हिडीओ यापूर्वीही व्हायरल झाले आहेत. पण असे व्हिडीओ बहुतेक लहान मुलांचे असतात. परंतु महिलांनी डान्स करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Read More