Marathi News> भारत
Advertisement

लपाछुपी खेळत असतांना 2 मुलांचा मृत्यू

लपाछुपी खेळतांना 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू

लपाछुपी खेळत असतांना 2 मुलांचा मृत्यू

नवी दिल्ली : लहानवयात आपण सगळ्यांनी लपाछुपीचा खेळ खेळला असेल. अनेकांसाठी याच्या आठवणी अजून देखील ताज्या असतील. पण उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये हा खेळ 2 मुलांच्या मृत्यूचं कारण बनलं आहे. मृत्यू झालेल्या मुलांच्या पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लपाछुपी खेळत असतांना दोन्ही मुले एका व्यक्तीच्या घरात एका पेटीत जाऊन लपले. तेव्हा अचानक पेटीची कडी लागली.

बराच वेळ झाला मुलं दिसत नसल्याने दोन्ही मुलांना शोधण्यासाठी गावातील लोकं बाहेर पडले. पण मुलांचा कोठेच काही ठामपत्ता लागत नव्हता. तेव्हा एकाचं लक्ष त्या पेटीवर गेलं. दोन्ही मुले त्या पेटीत बेशुद्ध अवस्थेत होते. उपचारासाठी त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दोघांचा मृत्यू झाला. 

साडे सहा वर्षाच्या अथर्व त्यागी दुसरीमध्ये शिकत होता तर मानव प्रजापति हा नर्सरीमध्ये शिकत होता. गुरुवारी शाळा सुटल्यानंतर दोघेही आपल्या घरी गेले. त्यानंतर खेळण्यासाठी दोघेही बाहेर पडले. दोन्ही मुलं इतर मुलांसोबत लपाछुपी खेळत होते. असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे.

Read More