Marathi News> भारत
Advertisement

पाकिस्तानकडून गोळीबार, दोन भारतीय जवान शहीद

पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेवर सुंदरबनी सेक्टरजवळ गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केले

पाकिस्तानकडून गोळीबार, दोन भारतीय जवान शहीद

जम्मू-काश्मीर : पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेवर सुंदरबनी सेक्टरजवळ गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात दोन जवान शहीद झालेत. रायफलमॅन विनोद सिंह आणि जकी शर्मा अशी शहीद झालेल्या जवानांची नावं आहेत. भारतीय लष्करानही गोळीबाराला जशाच तसं उत्तर दिले. सुंदरबनी सेक्टरजवळील भारतीय चौक्यांना पाकिस्तानी सैन्याने टार्गेट केले होते. मंगळवारी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानकडून छोटी शस्त्रे, स्वयंचलीत तोफांचा हल्ल्यासाठी वापर करण्यात आला. 

 पाकिस्तानच्या गोळीबारात विनोद सिंह आणि जाकी शर्मा हे दोन भारतीय जवान गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विनोद सिंह जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर जिल्ह्यातील खेती दानापूर येथील रहिवासी तर रायफलमॅन असलेले जाकी शर्मा हे जम्मूच्या संहैल गावचे रहिवासी आहेत.

About the Author
Read More