Marathi News> भारत
Advertisement

पगार न घेता भारतीय महिला करतात ७ लाखांपेक्षा जास्त काम

जगभरातील घर आणि मुले यांची काळजी घेणाऱ्या महिला वर्षभरात जवळपास १० हजार अब्ज डॉलरचे काम करतात

पगार न घेता भारतीय महिला करतात ७ लाखांपेक्षा जास्त काम

नवी दिल्ली : जगभरातील घर आणि मुले यांची काळजी घेणाऱ्या महिला वर्षभरात जवळपास १० हजार अब्ज डॉलरचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु या कामाची त्यांना भरपाई देखील मिळत नाही. हा आकडा जगातील सर्वात मोठी कंपनी अॅपलच्या वार्षिक व्यवहाराच्या तुलनेत ४३ टक्के अधिक आहे. 'ऑक्सफॅम'ने जाहीर केलेल्या अहवालातून ही माहिती  समोर आली आहे. 

भारतात महिला घर आणि मुलांची देखभाल यासारख्या कामांसाठी विनावेतन काम करतात. याचे मूल्य देशातील जीडीपीच्या ३.१ टक्के इतके आहे. या कामांमध्ये शहरी महिला ३१२ मिनिटे तर ग्रामीण महिला २९१ मिनिटे काम करतात. दरम्यान, या विनावेतन कामांसाठी शहरी पुरूष केवळ २९ मिनिटे तर ग्रामीण पुरूष ३२ मिनिटे खर्च करतात. 

'ऑक्सफॅम'ने दिलेल्या अहवालानुसार, पुरूषांच्या तुलनेत महिलांना कामाच्या बदल्यात कमी वेतन दिले जाते. पुरूष आणि महिला यांच्या वेतनात जवळपास ३४ टक्के अंतर आहे. त्यामुळे महिलांच्या वेतनावर अवलंबून राहणारे कुटुंब गरीब राहते. तसेच जात, धर्म, वय, स्त्री-पुरूष भेदभाव यांसारख्या कारणांमुळे देखील महिलांना दिल्या जाणाऱ्या वेतनात असमानता आढळते. 

Read More