Marathi News> भारत
Advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था, रस्ते ही सजलेत

ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था, रस्ते ही सजलेत

अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत. या दौऱ्यासाठी अहमदाबादमध्ये अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी मोटेरा स्टेडियम सज्ज आहेत. ट्रम्प हे विमानतळावरून निघाल्यानंतर रोड शो दरम्यान त्यांचं रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोकं स्वागत करण आहेत. अहमदाबादसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया स्थानिक व्यक्त करत आहेत. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहदाबादमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. रोड शोच्या मार्गावरचे रस्ते सजवण्यात आले आहेत. स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज झालं आहे. अनेक ठिकाणी छोटे स्टेज उभारण्यात आले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज साबरमती आश्रमाला देखील भेट देणार आहेत. त्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी साबरमती आश्रम सज्ज झाला आहे. इथं मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी भारत आतुर असल्याचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 

Read More