Marathi News> भारत
Advertisement

'महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतोय' विधानावर निशिकांत दुबे ठाम; आता म्हणाले, 'तुमच्यात हिंमत असेल तर...'

BJP MP Nishikant Dubey: भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी भाषेबाबत वादग्रस्त विधान केले ज्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला. 

'महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतोय' विधानावर निशिकांत दुबे ठाम; आता म्हणाले, 'तुमच्यात हिंमत असेल तर...'

BJP MP Nishikant Dubey: महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो असे विधान केल्याने भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. दरम्यान उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील दुबेंच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतलाय. पण निशिकांत दुबेंना आपल्या विधानाबद्दल कोणतीच खंत नाही. उलट ते आपल्या विधानावर ठाम आहेत. यावर जाऊन महाराष्ट्राच्या इकोनॉमित आमचं योगदान आहे, असं म्हटलंय. 

सहन करण्याच्या पलिकडे

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी भाषेबाबत वादग्रस्त विधान केले ज्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला. मुंबईत हिंदी भाषिकांना मारणाऱ्यांनी हिम्मत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवावे. आपल्या घरात कुत्राही वाघ असतो, असे ते म्हणाले. एवढच्यावरच न थांबता त्यांनी तुम्ही कोणाची भाकर खाता? टाटा, बिर्ला, रिलायन्सची युनिट्स महाराष्ट्रात नाहीत. महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतो, असेही त्यांनी म्हटले. आता निशिकांत दुबे यांनी आणखी महत्वाचे विधान केलंय.  मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेचा सन्मान आहे. तसा कन्नड, तामिळ, तेलगु यांना त्यांच्या भाषेचा सन्मान आहे. जसं त्यांना आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे, तसे बिहार, झारखंड मध्य प्रदेशच्या लोकांनाही त्यांच्या हिंदी भाषेबद्दल प्रेम आहे. त्यांना ठाकरे परिवार मारहाण करत असेल तर सहन करण्याच्या पलिकडे असल्याचे निशिकांत दुबे म्हणाले. 

'जाऊन अंबानी, मुस्लिमांना मारा'

माझी आणखी एक बाब तोडून मोडून सांगण्यात आली.  महाराष्ट्राचे देशाचे इकोनॉमीमध्ये मोठं योगदान आहे. माझं म्हणणं लोकांनी चुकीच्या पद्धतीने घेतलं. हे कोणीच अमान्य करणार नाही. महाराष्ट्र टॅक्स देतोय, त्या पैशात आमचं देखील योगदान आहे. याचं ठाकरे घराण्याशी काही देणंघेणं नाही. याचं मराठ्यांशी देणंघेणं नाही. तुम्ही गरीबांना मारहाण करता. तिथे मुकेश अंबानी आहेत. मराठी कमी बोलतात हिमंत असेल तर तिकडे जा. माहिममध्ये सारे मुस्लिम आहेत, तिकडे जा,असे आवाहन निशिकांत दुबे यांनी केले. 

महाराष्ट्राला डिवचणाऱ्या निशिकांत दुबेंची AI कडून पोलखोल; संपत्ती 640 टक्क्यांनी वाढली, आकडा एकदा पाहाच!

एसबीआयचा चेअरमन मराठी नाही बोलतं. आंध्रचा आहे. तेलगु बोलतो. जाऊन त्याला मारा. एलआयसीचा चेअरमन नॉर्थ इस्टचा आहे. गरीब जो कमवायला गेलाय, ज्याचा महाराष्ट्राच्या इकोनॉमीत योगदान आहे. टाटाची पहिली इंडस्ट्री बिहारमध्ये आहे. यात कोणती मोठी गोष्ट आहे. मी खासदार आहे. मला माहितीय कोणती गोष्ट बोलायची, असे ते म्हणाले.

74 कोटी रुपयांची संपत्ती

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, भाजप खासदार निशिकांत यांची एकूण मालमत्ता सुमारे 74 कोटी रुपयांची आहे. त्यांची देणी 8 कोटींपेक्षा जास्त आहेत. निशिकांत दुबे यांची जंगम मालमत्ता सुमारे 28 ते 30 कोटी रुपयांची आहे. तर त्यांची स्थावर मालमत्ता 43.87 कोटी रुपये इतकी आहे.

पत्नी अनामिका गौतम निशिकांत दुबेंपेक्षा श्रीमंत 

त्यांची पत्नी अनामिका गौतम निशिकांत दुबेंपेक्षा श्रीमंत आहेत. सुमारे 74 कोटी रुपयांच्या एकूण मालमत्तेपैकी अनामिका गौतम यांच्याकडे 51.13 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. उर्वरित सुमारे 23 कोटी रुपयांची मालमत्ता निशिकांत दुबे यांची आहे. निशिकांत दुबे यांचे भागलपूर, पटना, मुंबई, गुडगाव आणि दिल्ली येथे फ्लॅट आणि फार्म हाऊस आहेत. 2019 च्या प्रतिज्ञापत्रात निशिकांत दुबे यांनी लक्झरी कारची माहिती दिली होती. पण 2024 मध्ये वाहनाबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Read More