Marathi News> भारत
Advertisement

उत्तर प्रदेशात सुरक्षायंत्रणा हायअलर्टवर; योगींचे निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी

योगी आदित्यनाथ यांचे निवासस्थान असलेल्या ५ कालिदास मार्गावरील सुरक्षा कमालीची वाढवण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात सुरक्षायंत्रणा हायअलर्टवर; योगींचे निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा निनावी फोन कॉल आल्याने सध्या राज्यात खळबळ उडाली आहे. डायल -११२ वर कॉल करून अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली. हा फोन कॉल एका कॉल सेंटरवरुन आल्याचे समजते. यानंतर उत्तर प्रदेशातील सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहेत. योगी आदित्यनाथ यांचे निवासस्थान असलेल्या ५ कालिदास मार्गावरील सुरक्षा कमालीची वाढवण्यात आली आहे. याठिकाणी बॉम्ब स्क्वॉड आणि श्वानपथकाच्या मदतीने कसून तपासणी केली जात आहे. कालिदास मार्गावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याव्यतिरिक्त कॅबिनेट मंत्री श्रीकांत शर्मा आणि इतर काही मंत्र्यांची शासकीय निवासस्थाने आहेत.

योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मुंबईतून अटक

काही दिवसांपूर्वीच योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाला मुंबईतून अटक करण्यात आली होती. कामरान असे या तरुणाचे नाव होते. त्याने उत्तर प्रदेश पोलिसांच्या सोशल मीडिया हेल्प डेस्कवर फोन करुन ही धमकी दिली होती. यानंतर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्तपणे कारवाई करत कामरानला ताब्यात घेतले होते. 

'जैश'च्या निशाण्यावर केजरीवाल, सीएम योगी आणि मोहन भागवत

Read More