Marathi News> भारत
Advertisement

काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याची भरदिवसा हत्या

उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये सोमवारी भरदिवसा काँग्रेसच्या महिला पदाधिकारीची हत्या करण्यात आली.

काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याची भरदिवसा हत्या

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये सोमवारी भरदिवसा काँग्रेसच्या महिला पदाधिकारीची हत्या करण्यात आली.

बाईकवर आले हल्लेखोर

बागपतमधील केतीपुरा परिसरात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारात एका बाईकवर हल्लेखोर आले आणि त्यांनी गोळीबार केला.

बेगम यांचा घटनास्थळीच मृत्यू

बाईकवर आलेल्या तीन आरोपींनी ५० वर्षीय काँग्रेस नेता मुन्नी बेगम यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात मुन्नी बेगम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

पोलीस तपास सुरु

पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

परिसरात एकच खळबळ

भरदिवसा काँग्रेस पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतक महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले की, चार वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे मुन्नीवर हल्ला झाला होता. त्यावेळी जाहिद लम्बू नावाच्या व्यक्तीने हल्ला केला होता.

Read More