Marathi News> भारत
Advertisement

'मागणी पूर्ण न झाल्याने दारु पिऊन आला आणि...'आत्महत्येआधी हातापायवर लिहिलेल्या सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा!

UP Crime: आत्महत्या करण्यापूर्वी मनीषाने तिच्या शरीरावर सुसाइड नोट लिहिली आणि त्यात तिच्या मृत्यूसाठी पतीसह सासरच्या इतर मंडळींना जबाबदार ठरवले.

'मागणी पूर्ण न झाल्याने दारु पिऊन आला आणि...'आत्महत्येआधी हातापायवर लिहिलेल्या सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा!

UP Crime: उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सात जन्म साथ निभावण्याचा वचन देणाऱ्या पतीने अवघ्या 2 वर्षांनंतर बागपत जिल्ह्यातील रठौडा गावातील मनीषा (24) कडून घटस्फोट मागितला. यावर मनीषाने मंगळवारी रात्री कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी तिचा मृतदेह घरात पडलेला आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मनीषाने तिच्या शरीरावर सुसाइड नोट लिहिली आणि त्यात तिच्या मृत्यूसाठी पतीसह सासरच्या इतर मंडळींना जबाबदार ठरवले.

मृतीआधी लिहिली सुसाइट नोट 

कीटकनाशक प्राशन करण्यापूर्वी मनीषाने लग्नानंतरच्या प्रत्येक वेदनेची नोंद हात आणि पायावर लिहिली. तिने सुसाइड नोटमध्ये लिहिले की, माझ्या मृत्यूसाठी माझा पती, सासू, सासरे आणि दोन दीर जबाबदार आहेत, जे रठौडा येथे येऊन माझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी देऊन गेले. तिने लिहिले की, पतीने मला खूप मारहाण केली आणि खोलीत कोंडून अनेक दिवस उपाशी ठेवले.यानंतर हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने गोळ्या देऊन माझा गर्भपातही करवला. गावात झालेल्या पंचायतीत पतीने मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि गावकऱ्यांसमोर माझ्या कुटुंबाची बदनामी करून घटस्फोट मागितला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हुंडा न दिल्याने मनीषाचा सासरी छळ झाला आणि तिचा गर्भपातही करवला गेला. जुलै 2024 मध्ये मनीषाला माहेरी घेऊन आल्याची माहिती रठौडा गावातील गाझियाबाद एमसीडी कर्मचारी तेजवीर यांनी दिली. 4 दिवसांपूर्वी सासरच्या मंडळींसोबत चर्चा झाली. पंचायतीत नातेवाईक आणि इतर लोकही उपस्थित होते आणि दोन्ही पक्षांमध्ये घटस्फोटासाठी सहमती झाली.मनीषाने शेतात वापरण्यासाठी ठेवलेले कीटकनाशक प्राशन केले. यानंतर पतीने मनीषाला घटस्फोटाच्या कागदांवर स्वाक्षरी करण्यास सांगितले, पण तिने नकार दिला. तेव्हापासून मनीषा उदास राहू लागल्याचे ते म्हणाले.

कीटकनाशक प्राशन

मंगळवारी रात्री उशिरा मनीषाने आई सुनीता, नीरज, बाबा जयभगवान, भाऊ रितिक आणि हार्दिक झोपले असताना शेतात वापरण्यासाठी ठेवलेले कीटकनाशक प्राशन केले. बुधवारी सकाळी कुटुंबीयांना झोपेतून जाग आल्यानंतर मनीषाचा मृतदेह पडलेला आढळला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, फॉरेन्सिक पथकाने तपास केला आणि गावकऱ्यांशीही चौकशी केली. पोलिसांनी सांगितले की, प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि तक्रारीच्या आधारे कारवाई केली जाईल. रठौडा येथे मनीषाच्या मृत्यूच्या प्रकरणात कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला जाईल. मनीषाच्या शरीरावर सुसाइड नोट लिहिलेली होती आणि तिने सासरच्या छळाबाबत बरेच काही लिहिले आहे.

पंचायतीनंतरही तोडगा निघाला नाही

2023 मध्ये मनीषाच्या लग्नात हुंडा म्हणून बुलेट बाइक दिली होती. त्यानंतर सासरच्या मंडळींनी जास्त हुंड्याची मागणी सुरू केली. आरोप आहे की, मागणी पूर्ण न झाल्याने मनीषाचा पती दारू पिऊन तिला खोलीत कोंडून मारहाण करायचा, असे रठौडा येथील रहिवासी विवेक यांनी सांगितले. लग्नाच्या पाच महिन्यांनंतरच त्यांना त्यांच्या बहिणीला रठौडा येथे घेऊन यावे लागले. गावातील समाजबांधवांनी पंचायत घेतली तेव्हा दोनदा दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला, पण सासरी मनीषाचा छळ थांबला नाही. मृत मनीषा ही चार भावंडांपैकी तिसऱ्या क्रमांकावर होती. तिचा मोठा भाऊ विवेक याचे लग्न झाले आहे, तर दोन भाऊ अविवाहित असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Read More