Marathi News> भारत
Advertisement

VIDEO : एक्सप्रेस वेवर चालत्या बाईकनं पेट घेतला अन्...

दुचाकीवरून एक पुरुष, एका महिलेसोबत आणि एका चिमुरड्यासोबत वेगानं जात असताना त्यांच्या बाईकनं अचानक पेट घेतला 

VIDEO : एक्सप्रेस वेवर चालत्या बाईकनं पेट घेतला अन्...

इटावा : दुचाकीवरून जात असताना अचानक दुचाकीला आग लागली परंतु, हे ध्यानीमनी नसलेल्या एका दाम्पत्याला वेळीच रोखून त्यांचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कामगिरी बजावलीय. इटावामध्ये लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वेवर ही घटना घडली. 

दुचाकीवरून एक पुरुष, एका महिलेसोबत आणि एका चिमुरड्यासोबत वेगानं जात असताना त्यांच्या बाईकनं अचानक पेट घेतला. दरम्यान, हायवेवर पेट्रोलिंग करणाऱ्या सतर्क पोलिसांच्या ही गोष्ट ध्यानात आली. उत्तरप्रदेश पोलिसांच्या १०० नंबर टीमच्या PRV-1617 या गाडीनं लागलीच बाईकच्या पाठीमागून धाव घेत बाईकस्वाराला वेळीच थांबवलं आणि पुढची दुर्घटना टळली. 

पोलिसांनी बाईकस्वाराला थांबवल्यानंतर लागलीच महिला आणि बाळाला बाजुलाच सुरक्षित ठिकाणी नेलं आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुर केले. या घटनेत बाईकचा मागचा टायर जळाला. बाईकच्या मागच्या भागात लटकावलेल्या टायरला घर्षणामुळे आग लागली होती. ही आग आणखी पसरली असती तर चालत्या अवस्थेतच बाईकचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती.

डीजीपी ओ पी सिंह यांनीही सतर्क पोलिसांच्या कामगिरीची दखल घेतलीय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करता पोलिसांचं कौतुक करतानाच त्यांचा सन्मान करण्याची घोषणाही डीजीपींनी केलीय. एक्सप्रेस हायवेवर उत्तर प्रदेश पोलिसांच्या टीमचे हेड कॉन्स्टेबल ओम सिंह, शिपाई विक्रम सिंह आणि शिपाई चालक अमित तैनात होते.

Read More