Marathi News> भारत
Advertisement

'जास्त मुलं जन्माला घातली तर दहशतवादीच होणार'

भाजपाचे माजी खासदार रामविलास वेदांती यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

'जास्त मुलं जन्माला घातली तर दहशतवादीच होणार'

इटावा : भाजपाचे माजी खासदार रामविलास वेदांती यांनी वादग्रस्त विधान केले आहे. कट्टर इस्लामिक लोक जास्त मुलांना जन्म देत आहेत, यातून दहशतवादीच बनणार असे बेजाबदार विधान त्यांनी केले आहे. विजयादशमीनिमित्त श्रीराम यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी ते इटावा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. हे पाहता आम्ही लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा बनवू. ते एवढे बोलूनच थांबले नाहीत. तर सपा, बसपा आणि काँग्रेस हे दहशतवाद्यांसोबतच असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

देशामध्ये विशिष्ट वर्गाची संख्या वाढत चालली आहे. देशाच्या आतमध्ये काही असे कट्टर इस्लामिक लोकं आहेत, जे एक नाही तर चार लग्न करतात आणि नंतर घटस्फोट देतात. अयोध्येच्या बाजूला टांडा येथे एका व्यक्तीने ४० विवाह केले आणि १०७ मुलांना जन्म दिला. एक व्यक्ती जर १०७ मुलांना जन्म देत असेल तर ते दहशतवादीच बनणार ना ? असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

Read More