Marathi News> भारत
Advertisement

यूजर्सला मिळालं सगळ्यात मोठं Gift; आजपासून UPI मध्ये होणार हे बदल, जाणून घ्या कसा होणार फायदा?

UPI Payments :  यूपीआयच्या नवीन नियमानुसार वापरकर्त्यांचा चक्क अनुभव बदलणार..., जाणून घ्या कसा?

यूजर्सला मिळालं सगळ्यात मोठं Gift; आजपासून UPI मध्ये होणार हे बदल, जाणून घ्या कसा होणार फायदा?

UPI Payments : नवीन नियमांनुसार आजपासून यूपीआय (Unified Payment Interface) वापरणाऱ्या नेटकऱ्यांना काही महत्त्वाचे बदल अनुभवायला मिळणार आहेत. NPCI (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने या बदलांची घोषणा केली असून, त्याचा उद्देश म्हणजे पेमेंट करताना युपीआय अ‍ॅप, फोन पे, गूगल पे आणि पेटीएमनं होणारे सगळे ट्रान्झॅक्शन हे सहज होतील.

नेमकं काय बदललंय?

याआधी, यूपीआय ट्रान्झॅक्शन पूर्ण झाली की नाही हे समजण्यासाठी 30 सेकंद वाट पाहावी लागत होती. आता ही वेळ 10 सेकंदांवर आणण्यात आली आहे. म्हणजेच, तुम्ही पेमेंट केल्यावर ते यशस्वी झालं की नाही, याचा मेसेज आता फक्त 10 सेकंदात मिळणार आहे. तसंच, 'पे' आणि 'कलेक्ट' या पर्यायासाठी अ‍ॅड्रेस व्हॅलिडेट करण्याची वेळही 15 सेकंदांवरून 10 सेकंदांवर आणण्यात आली आहे.

या बदलाचा मुख्य हेतू काय आहे?

या सगळ्या बदलांचा उद्देश एकच आहे ती युजर्सचा अनुभव अधिक चांगला करणं आणि त्यांचा जास्त वेळ वाया न जाऊ देणं. कमी वेळेत उत्तर मिळाल्यामुळे ट्रान्झॅक्शन करताना गोंधळ कमी होईल आणि प्रक्रिया अधिक सुलभ होईल.

किती रक्कमेपर्यंत करू शकता यूपीआय पेमेंट?

फोन पे, गूगल पे, पेटीएमसारख्या यूपीआय अ‍ॅप्सच्या माध्यमातून एकावेळी किंवा टप्प्याटप्प्याने 2 लाख रुपये ट्रान्सफर करता येतात.

आजकाल अगदी चहाच्या टपरीपासून मोठ्या मॉलपर्यंत सगळीकडे यूपीआय स्वीकारतात. त्यामुळे कॅशची गरज आता राहिलेली नाही.

धोका टाळण्यासाठी काय करावं?

जसं डिजिटल पेमेंट वाढतंय, तसंच सायबर फसवणुकीचं प्रमाणही वाढतंय. म्हणूनच, कोणत्याही यूपीआय अ‍ॅपचा वापर करताना कोणती काळजी घ्यायची ते जाणून घ्या

1. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका

2. तुमचं UPI PIN कुणालाही सांगू नका

3. अविश्वसनीय ऑफर किंवा इनामाच्या बहाण्याने आलेले मेसेज किंवा कॉल्सपासून सावध राहा

हेही वाचा : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर गायब आहे 'हा' दिग्दर्शक, पत्नीनं केला धक्कादायक खुलासा

यूपीआयने खरंच आपलं जीवन सोपं केलंय, पण सावधगिरी ही खूप महत्त्वाची आहे. आता नव्या बदलामुळे ट्रान्झॅक्शन हे वेगानं होचील आणि त्याचे अनुभवही चांगले असतील.

Read More