Marathi News> भारत
Advertisement

UPI Rules: भारतातील 35 कोटी UPI यूजर्ससाठी महत्वाची अपडेट,1 ऑगस्टपासून होणार मोठे बदल!

UPI Rules:  यूपीआय अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनणार आहे. 

UPI Rules: भारतातील 35 कोटी UPI यूजर्ससाठी महत्वाची अपडेट,1 ऑगस्टपासून  होणार मोठे बदल!

UPI Rules: आज प्रत्येकजण UPI (युनिफाइड पेमेंट सर्व्हिसेस) वापरत आहे. आपण प्रत्येक लहान-मोठ्या गरजेसाठी UPI वापरतो. 1 ऑगस्टपासून UPI सेवेत अनेक मोठे बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होईल. यूपीआय (UPI) प्रणालीत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने काही महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. यामुळे यूपीआय अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनणार आहे. काय बदलेल? सर्वसामान्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होईल? जाणून घेऊया.

बॅलन्स चेक मर्यादा

ज्या यूजर्संना वारंवार UPI बॅलन्स तपासण्याची सवय आहे त्यांना समस्या येऊ शकतात. याशिवाय ज्या लोकांचे खाते एकाच नंबरशी जोडलेले आहे त्यांना देखील समस्या येऊ शकतात. नवीन नियमानुसार UPI अॅपमध्ये दिवसातून फक्त 50 वेळा बॅलन्स तपासता येतो.

ऑटो पेमेंटमधील बदल

आता तुम्ही UPI संबंधित ऑटो पेमेंट जसे की नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन आणि SIP पेमेंट फक्त नॉन-पीक अवर्समध्ये करू शकाल. हे पेमेंट सकाळी 10 वाजण्यापूर्वी, दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि रात्री 9.30 नंतर करता येतील.

थेट पेमेंट 

या नवीन नियमांनुसार आता UPI वापरकर्ते युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) शी लिंक करून फिक्स्ड डिपॉझिट, शेअर्स, बॉन्ड्स, प्रॉपर्टी, सोने किंवा वैयक्तिक आणि व्यवसाय कर्ज ओव्हरड्राफ्ट वापरू शकतील. म्हणजेच, आता वापरकर्ते पेटीएम, फोनपे, गुगल पे सारख्या थर्ड पार्टी UPI अॅप्लिकेशन्सद्वारे त्यांच्या कर्ज खात्यातून थेट पेमेंट करू शकतील.

NPCI ने एक नवीन परिपत्रक

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या नवीन परिपत्रकानुसार, आता UPI द्वारे क्रेडिट लाइनद्वारे रोख रक्कम काढणे, एखाद्याला पैसे पाठवणे आणि लहान दुकानदारांना पेमेंट करण्याची सुविधा देखील उपलब्ध असेल. पूर्वी, UPI वर क्रेडिट लाइनद्वारे दुकानांमध्ये पेमेंट केले जात होते, परंतु आता कर्ज ओव्हरड्राफ्ट UPI शी लिंक करून वापरता येते.

क्रेडिट लाइन

क्रेडिट लाइन हे एक प्रकारचा कर्ज आहे. हे कर्ज बँक किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेद्वारे तुमच्या उत्पन्नाच्या आणि क्रेडिट स्कोअरच्या आधारावर मंजूर केले जाते. तुम्ही बँकेने आधीच मंजूर केलेले क्रेडिट लाइन खाते UPI शी लिंक करू शकता आणि तुमच्या गरजेनुसार ते वापरू शकता आणि नंतर परतफेड करू शकता.

Read More