Marathi News> भारत
Advertisement

IAS अधिकाऱ्यांची बदली किती दिवसांनी होते आणि कोण घेतं याबाबतचा निर्णय?

IAS Officer Transfer: किती दिवसांच्या सेवेनंतर होते आयएएस अधिकाऱ्यांची बदली?  (IAS Officer) च्या ट्रान्सफरसंदर्भातील ही गोष्ट फार कमीजणांना माहितीये...   

IAS अधिकाऱ्यांची बदली किती दिवसांनी होते आणि कोण घेतं याबाबतचा निर्णय?

IAS Officer Transfer Details: जेव्हाजेव्हा सर्वोच्च पदावरील सरकारी नोकऱ्यांची चर्चा होते तेव्हा अनेकदा स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या बहुविध पदांचीच चर्चा होते. यामध्ये आयएएस हा सर्वोच्च हुद्दा ठरतो. दरवर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षांसाठी देशातून लाखोंच्या संख्येनं परीक्षार्थी परीक्षा देतात आणि त्यातून फार कमी परीक्षार्थींना देशसेवेच्या या कारकिर्दीत पुढे जाण्याची संधी मिळते. यापैकी काही उत्तीर्ण 
उमेदवार आयएएस किंवा मग आयपीएस अशा सेवांची निवड करतात. पण, तुम्हाला या अधिकाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया नेमकी कशी होते माहितीये? 

बदलीसाठी किती दिवसांची मुदत आवश्यक? 

उपलब्ध माहितीनुसार आयएएस अधिकाऱ्यांना किमान दोन वर्षांपर्यंत कोणा एका जिल्ह्यात सेवेची संधी दिली जाते. मात्र एखादा विशेष प्रसंग, कायदा आणि सुव्यवस्था, राजकीय कारण, प्रशासकीय मतभेद अशा अनेक कारणांनी दोन वर्षांच्या कालावधीपूर्वीच त्यांची बदली होऊ शकते. 

बदली करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? 

Department of Personnel and Training - DoPT नुसार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया केंद्र आणि राज्य शासनाच्या परवानगीने होते. सहसा यामध्ये राज्य शासनाचा मोठा वाटा असतो. मात्र काही कारणास्तव हा मुद्दा केंद्र सरकारशी संलग्न असल्यात तिथंच त्याबाबतचा निर्णय घेतला जातो. 

हेसुद्धा वाचा : बजाजची Chetak 35 स्कूटर ₹20000 नी स्वस्त; आता पेट्रोलची कटकट नाही, सिंगल चार्जमध्ये मनसोक्त फिरा

सनदी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण कुठे होतं? 

(UPSC Exam) युपीएससीची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आयएएस उमेदवारांना त्यासाठीचं रितसर प्रशिक्षण दिलं जातं. मसुरी इथं लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) इथं यासाठीची संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण होते. हा एक फाऊंडेशन कोर्स असून, IAS, IPS, IFS अशा सर्व अधिकाऱ्यांसाठी लागू असतो. इथं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयएएस अधिकारी त्यांच्या कॅडर स्टेटमध्ये पोहोचतात जिथं त्यांना जिल्हाधिकाऱ्यांअतर्गत सेवेत रुजू व्हावं लागतं. प्रोबेशनची वेळ पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाकडून या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बदली दिली जाते. 

Read More