Marathi News> भारत
Advertisement

UPSC उमेदवारांसाठी App लाँच, भरती आणि परीक्षांची माहिती मिळणार एका क्लिकवर

यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी कामाची बातमी आहे. उमेदवारांना यापुढे UPSC द्वारे घेण्यात येणारी भरती आणि त्यांच्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांशी संबंधित माहिती मिळविण्याची चिंता करावी लागणार नाही

UPSC उमेदवारांसाठी App लाँच, भरती आणि परीक्षांची माहिती मिळणार एका क्लिकवर

UPSC Launched Mobile App: यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी कामाची बातमी आहे. उमेदवारांना यापुढे UPSC द्वारे घेण्यात येणारी भरती आणि त्यांच्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांशी संबंधित माहिती मिळविण्याची चिंता करावी लागणार नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाने उमेदवारांसाठी पुढाकार घेतला आहे.  केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध UPSC परीक्षा आणि भरतीबाबत माहिती देण्यासाठी अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपचे नाव UPSC Official App असं आहे. हे अ‍ॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.

या अ‍ॅपमुळे उमेदवार चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीपासूनही दूर राहतील. पण अ‍ॅपच्‍या माध्‍यमातून उमेदवार आपला ऑनलाइन अर्ज भरू शकणार नाहीत. यापूर्वी यूपीएससीने वन टाइम रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म लाँच केला होता. उमेदवारांनी upsconline.nic.in या वेबसाइटला भेट देऊन OTR प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

अ‍ॅप कसे डाउनलोड करायचे? जाणून घ्या

  • सर्व प्रथम मोबाईलमध्ये Google Play Store ओपन करा.
  • सर्च बारमध्ये UPSC Official App टाका आणि योग्य अ‍ॅपवर क्लिक करून डाऊनलोड करा
  • UPSC अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, स्क्रीनवर दिसणार्‍या 'Open' पर्यायावर जा.
  • आता तुम्ही UPSC द्वारे आयोजित विविध परीक्षांचे वेळापत्रक तपासू शकता.

लोकसेवा आयोग दरवर्षी अनेक भरती परीक्षा घेते. नागरी सेवा परीक्षेव्यतिरिक्त, त्यात एनडीए-एन भरती परीक्षा, सीडीएस, सीएपीएफ असिस्टंट कमांडंट भरती परीक्षा, भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षा इत्यादींचा समावेश आहे.

Read More