UPSC Recruitment 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नवीन भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. यावेळी यूपीएससीने अधिकारी पदांसाठी भरती जाहीर केलीय. या सर्व भरती विविध केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विभागांमध्ये होणार आहेत. याअंतर्गत 200 हून अधिक कायमस्वरूपी पदं भरली जातील. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जारी करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आलाय.
यूपीएससी भरती २०२५ अंतर्गत एकूण 241 पदे भरणार आहे. याअंतर्गत प्रादेशिक संचालक, प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, व्यवस्थापक, विभाग अधिकारी आणि इतर पदे भरली जाणार आहेत.
यूपीएससी भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ / मंडळ / संस्थेतून इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी / पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय 30 वर्षे आणि कमाल वय 50 वर्षेांदरम्यान असणे आवश्यक आहे.
ग्रुप बी अंतर्गत येणाऱ्या वैज्ञानिक सहाय्यक, इ पदांसाठीी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 44 हजार 900 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. ग्रुप ए अंतर्गत येणाऱ्या अधिकारी, प्राध्यापक, इ. पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 78 हजार 800 रुपये पगार दिला जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता, संबंधित अनुभव आणि भरती परीक्षा / मुलाखतीतील कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
सामान्य श्रेणीतील उमेदवारांकडून फक्त 25 रुपये शुल्क भरावे लागेल. महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि बेंचमार्क अपंगत्व असलेल्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
यूपीएससी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा. होमपेजवर “ऑनलाइन अर्ज करा” टॅबवर क्लिक करा. ORA नोंदणी लिंकवर क्लिक करा. नोंदणी करा आणि पदांसाठी अर्ज करा. फॉर्म भरा, फी भरा आणि फॉर्म सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
28 जून 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून 17 जुलै ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 17 जुलै ही शुल्क भरण्याची तारीख असून परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवार 17 जुलै 2025 पर्यंत आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsconline.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.