Marathi News> भारत
Advertisement

ट्रक-टाटा मॅजिक अपघातात १३ ठार, दोन महिलांचा समावेश

  ट्रक आणि टाटा मॅजिक गाडी यांच्यात झालेल्या धडकेत दोन महिलांसहित १३ जण ठार झाले. यात ४ जण जखमी झालेत. 

ट्रक-टाटा मॅजिक अपघातात १३ ठार, दोन महिलांचा समावेश

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशात लखीमपूर खीरी येथे आज पहाटे ट्रक आणि टाटा मॅजिक गाडी यांच्यात झालेल्या धडकेत दोन महिलांसहित १३ जण ठार झाले. यात ४ जण जखमी झालेत. लखीमपूर खीरी येथे राष्ट्रीय महामार्गावर 'पापा जी का ढाबा' जवळ हा अपघात झाला. घटनास्थळी ९ जणांचा मृत्यू झाला. तर चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. 

शाहजहाँपूर येथून सीतापूर येथ जाणारी टाटा मॅजिक थेट ट्रकमध्ये घुसली. त्यामुळे टाटा मॅजिक गाडीतील १७ पैकी ९ जण जागीच ठार झाले. तर अन्य चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. ठार झालेल्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. अपघातातील जखमींना सीतापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, टाटा मॅजिक सुस्साट वेगाने होती. त्यामुळे गाडीवर नियंत्रण मिळविण्यात चालकाला अपयश आले आणि थेट ट्रकवर जावून आदळली आणि अपघात झाला. या गाडीत क्षमतेपेक्षा जास्त लोक भरण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय. 

Read More