Marathi News> भारत
Advertisement

मजुरांना गावी नेणाऱ्या ट्रॉलीला अपघात, २३ जण जागीच ठार

या अपघातात २३ मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला तर २० मजूर गंभीर जखमी 

मजुरांना गावी नेणाऱ्या ट्रॉलीला अपघात, २३ जण जागीच ठार

ओरिया : लॉकडाऊन दरम्यान रेल्वे रुळामार्गे आपल्या गावी जाणाऱ्या मजुंराचा अपघात झाल्याची घटना गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातून समोर आली होती. आता उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघात अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले आहे. फरीदाबादहून ८१ मजुरांना घेऊन येणाऱ्या ट्रॉलीला डीसीएमची धडक बसल्याची दुर्देवी घटना शनिवारी पहाटे समोर आली. या अपघातात २३ मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला तर २० मजूर गंभीर जखमी झाले. 

हे सर्व मजूर फरीदाबादहून गोरखपूर येथे जात असताना हा अपघात झाला. स्थानिकांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना कळवली. घटनास्थळी डीएम अभिषेक सिंह आणि एसपी उपस्थित आहेत. २० जखमी मजुरांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती डीएमनी दिली. तर २३ जण मृत्युमुखी पडल्याच्या वृत्ताला देखील दुजोरा देण्यात आला आहे. जखमींची अवस्था अगदी नाजूर असून याचील १५ जणांना सैफई वैद्यकीय रुग्णालयात दाखल केल्याचे सिंह म्हणाले. 

ओरिया शहर कोतवाली क्षेत्राच्या मिहौली राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. फरीदाबाद येथून ८१ मजुरांना आणण्यात येत होती. हे मजुर फरीदाबाद येथून गोरखपूर येथे जात होते. पोलीस आणि आरोग्यकर्मचाऱ्यांचे बचाव कार्य सुरु आहे. 

औरंगाबाद घटना 

लॉकडाऊनमध्ये मजुरांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. खायला अन्न नसल्याने त्यांना आपल्या गावी पोहोचायचे आहे. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने अन्यथा पायीच ते गावपर्यंतचा प्रवास करत आहेत. औरंगाबाद-जालनादरम्यान मजूर रुळांवर झोपले असताना रेल्वेखाली आल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. जालनाहून भुसावळकडे पायी जाणारे मजूर, मध्यप्रदेशला निघाले होते. हे मजूर रेल्वे रुळांच्या बाजूने चालत होते. मात्र थकवा आल्याने मध्येच आरामासाठी ते रुळांवरच झोपले होते. यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला होता.

Read More