Marathi News> भारत
Advertisement

Video : देवभूमी उत्तराखंडमध्ये निसर्ग कोपला; चमोलीत अह्यापही 8 जण हिमकड्याखालीच, घटनास्थळाची दृश्य मन सुन्न करणारी

Uttarakhand avalanche video : उत्तराखंडमध्ये निसर्ग कोपला. देशाच्या सीमेलगत असणाऱ्या गावात नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर वृत्त... 

Video : देवभूमी उत्तराखंडमध्ये निसर्ग कोपला; चमोलीत अह्यापही 8 जण हिमकड्याखालीच, घटनास्थळाची दृश्य मन सुन्न करणारी

Uttarakhand avalanche video : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार उत्तराखंडमध्ये वातावरणात मोठे बदल झाले आणि परिस्थिती बिघडताना दिसली. राज्याच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये जोरदार हिमवृष्टीनं अडचणी वाढवल्या आणि त्यातच उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात असणाऱ्या माणा इथं हिमकडा कोसळल्यानं मोठं संकट ओढावलं. देवभूमीत निसर्ग कोपल्यामुळं जवळपास 55 ते 53 मजूर बर्फाच्या विळख्यात आले आणि या घटनेची माहिती मिळतात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या तुकडीनं तातडीनं घटनास्थळ गाठत तिथं बचावकार्य सुरू झालं. 

अधिकृत माहितीनुसार यापैकी 47 मजुरांना वाचवण्यात यश आलं असून, अद्यापही 8 मजुर बर्फाच्या ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. समुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर असणाऱ्या या ठिकाणी बचावकार्यात अनेक अडथळे उदभवत असून, सतत होणाऱ्या हिमवृष्टीमुळं हे संकट आणखी गडद होताना दिसत आहे. हवामानाच्या या रौद्र रुपामुळं सध्या बचावपथकांनीसुद्धा आपल्या जीवाची बाजी लावत कोणत्याही ऑक्सिजन पुरवठ्याशिवाय या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. बचावकार्याच्या या चमूला मैदानी क्षेत्रांमध्ये असणाऱ्या तुकड्या डोंगररांगांतून वाट काढण्यासाठीचं मार्गदर्शन करत असल्याची माहिती संबंधित प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली. 

...आणि ते 2 मजूर बचावले 

सकाळी जवळपास 8 वाजण्याच्या सुमारास कॅम्पजवळ हिमस्खलन झालं आणि यामध्ये 55 मजूर हिमकड्याखाली आहे. या मजुरांमधील दोघांची सुट्टी असल्यामुळं ते या संकटातून बचावले, सदर घटनेची माहिती मिळताच इंडो तिबेटन सीमा सुरक्षा दल आणि भारतीय लष्कराच्या जवनांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतलं, अशी माहिती चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी यांनी दिली. 

मजुरांनी चमोलीतील माणा या गावी बद्रीनाथ मंदिरापासून साधारण 6 किमी अंतरावर असणाऱ्या भागात वस्ती केली होती. देहरादूनपासून हा भाग 260 किमीवर असल्याचं सांगण्यात येतं. सदर दुर्घटनेनंतर रात्रीच्या वेळी इथं दृश्यमानता शून्य असल्यामुळं बचावकार्यात कैक अडचणी आल्या. 

हिमस्खलनात अडकलेल्या मजुरांच्या नावांची यादी 

1. अभिनाश कुमार – बिहार
2. अरविंद कुमार सिंह – उत्तराखंड
3. दिलेर सिंह – जम्मू-कश्मीर
4. राम सुजन सिंह – उत्तर प्रदेश
5. जगबीर सिंह – पंजाब
6. अभिषेक पंवार – उत्तराखंड
7. इंद्रजीत कुमार भारती – बिहार
8. अभिषेक आनंद – बिहार
9. धीरज कुमार पासवान – बिहार
10. नरेश बिष्ट – उत्तराखंड
11. मोहिंदर पाल – हिमाचल प्रदेश
12. मनोज भंडारी – उत्तराखंड
13. मुन्ना प्रसाद – बिहार
14. किसान कुमार – बिहार
15. सत्य प्रकाश यादव – उत्तर प्रदेश
16. पंकू – हिमाचल प्रदेश
17. अनिल कुमार – उत्तराखंड
18. दिलीप कुमार – बिहार
19. विपन कुमार – हिमाचल प्रदेश
20. पवन – उत्तर प्रदेश
21. मंजीत यादव – उत्तर प्रदेश
22. गोपाल दत्त जोशी – हिमाचल प्रदेश
23. सुनील कुमार – हिमाचल प्रदेश
24. लड्डू कुमार पंडित – बिहार
25. हरमेश चंद – हिमाचल प्रदेश
26. चंद्रभान सिंह – उत्तर प्रदेश
27. विजयपाल – बिहार
28. जीतेश कुमार – बिहार
29. आलोक यादव – उत्तर प्रदेश
30. गणेश राम आर्य – उत्तराखंड
31. पिंटू कुमार – बिहार
32. जितेंद्र सिंह – हिमाचल प्रदेश
33. जयहिंद्र प्रसाद सिंह – (राज्याचं नाव समोर येऊ शकलं नाही)
34. नरेश रजक – (राज्याचं नाव समोर येऊ शकलं नाही)
35. अशोक कुमार – उत्तराखंड
36. बलवंत सिंह समंत – उत्तराखंड
37. दीक्षित सिंह – उत्तराखंड
38. विजय कुमार – (राज्याचं नाव समोर येऊ शकलं नाही)
39. लक्ष्मण सिंह समंत – उत्तराखंड
40. अशोक – उत्तर प्रदेश
41. अनिल – उत्तराखंड
42. सुपारी – (राज्याचं नाव समोर येऊ शकलं नाही)
43. हरी बहादुर – (राज्याचं नाव समोर येऊ शकलं नाही)
44. नर बहादुर – (राज्याचं नाव समोर येऊ शकलं नाही)
45. नरेंद्र – (राज्याचं नाव समोर येऊ शकलं नाही)
46. जय शंकर – (राज्याचं नाव समोर येऊ शकलं नाही) 
47. सूर्या – (राज्याचं नाव समोर येऊ शकलं नाही)
48. हरी कृष्णा – (राज्याचं नाव समोर येऊ शकलं नाही)
49. करण प्रसाद – (राज्याचं नाव समोर येऊ शकलं नाही)
50. सिंघा – (राज्याचं नाव समोर येऊ शकलं नाही)
51. महेंद्र – (राज्याचं नाव समोर येऊ शकलं नाही)
52. गोविंद सिंह – उत्तर प्रदेश
53. विवेक सिंह – उत्तर प्रदेश
54. सुखदेव – उत्तर प्रदेश
55. राजेंद्र सिंह – उत्तर प्रदेश

Read More