Viral Video : सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओने चांगलीच खळबळ उडवली आहे. या व्हिडिओत चक्क फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या घरी पाण्याचा टँकर भरण्यात आला. या व्हिडिओत बंगल्याच्या बाहेर आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाची प्लेटही दिसत आहे. ही घटना उत्तराखंडमधल्या देहरादून इथल्या इस्ट कॅनाल रोड भागातली आहे. महाराष्ट्र कॅडरच्या 1993 च्या बॅटच्या आयपीएस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या बंगल्यातला हा व्हिडिओ आहे.
अर्चना त्यागी या मूळच्या देहरादूनमधल्या आहेत. त्या सुपरकॉप म्हणून प्रसिद्ध आहेत. 2019 मध्ये प्रदर्शित झालेला 'मर्दानी 2' हा चित्रपटा अर्चना त्यागी यांच्या कारकिर्दीवरच होता. यात अभिनेत्री राणी मुखर्जीने अर्चना त्यागी यांची भूमिका साकारली होती.
तो व्हिडिओ खरा आहे का?
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यनंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक अमित सिन्हा यांनी या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं म्हटलं आहे. आयपीएस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या घरातील पाण्याच्या टाक्या खरच फायर ब्रिगेडच्या गाड्यांमधून भरण्यात आल्या आहेत का? आता कोणताही निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. व्हिडिओची प्रामाणिकपणे चौकशी केली जाईल असं अमित सिन्हा यांनी म्हटलंय.
दुसरीकजे मुख्य अग्निशमन अधिकारी वंश बहादुर यादव यांनी ही घटना 15 जूनची असल्याचं म्हटलंय. पण आयपीएस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या घरी एलपीजी गॅस लीक होण्याची सूचना मिळाली होती, त्यावेळी अर्चना त्यागी यांचे वृद्ध आई-बाबा घरी होते. सूचना मिळताच अग्मिशमन दलाची गाडी त्यांच्या घरी पाठवण्यात आली असं स्पष्टीकरण वंश बहादुर यादव यांनी दिलंय.
उत्तराखंड
— Samachar News India (@SamacharNewsIND) July 30, 2024
उत्तराखंड में महाराष्ट्र कैडर की 1993 बैच की आईपीएस है अर्चना त्यागी
देहरादून स्थित इनके सरकारी घर में पानी ख़त्म हुआ तो इन्होंने हज़ार रुपये का टैंकर नहीं ख़रीदा#UttarakhandPolice #ArchanaTyagi @uttarakhandcops pic.twitter.com/bIeqxGYSCY
व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एका अधिकाऱ्याच्या घरी पाण्याची टाकी भरण्याचं काम फायर ब्रिगेडच्या कर्तव्यात येतं का? असा सवाल विचारला जात आहे. सार्वजनिक सेवांचा हा दुरुपोयग असल्याच्या प्रतिक्रिया काही लोकांनी दिल्या आहेत.
या व्हिडिओवर अधिकारी वर्गाने सावध भूमिका घेतली आहे. खरंच आयपीएस अधिकाऱ्याने प्रोटोकॉलचं उल्लंघन केलं आहे का? हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.