Uttarakhand Accident: उत्तराखंडच्या बद्रीनाथ मार्गावर एका यात्रेकरूंनी भरलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरचा घसरून अलकनंदा नदीत कोसळला. यावेळी चार-पाच जणांनी बसमधून बाहेर पडले. या अपघातानंतर परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये एकूण 18-20 प्रवासी प्रवास करत होते. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. यामध्ये 8 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. भूस्खलन व पावसामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हा अपघात बद्रीनाथ महामार्गावर घडला आहे. घोलथिरजवळ बस अनियंत्रित झाली आणि हा अपघात झाला. यामुळे प्रवाशांचा ट्रेम्पो हा थेट अलकनंदा नदीत कोसळला. बसमध्ये अनेक प्रवासी होते. गेल्या अनेक दिवसांपासून तिथे पाऊस पडत आहे. डोंगर भागात पडलेल्या पावसामुळे नदीचा प्रवास देखील प्रचंड वेगवान आहे. यामधील काही प्रवासी बसमधून खाली पडले. सध्या त्यांचा शोध सुरु आहे.
बचावकार्य युद्धपातळीवर सुरु
या अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफची टीम तिथे दाखल झाली. त्यावेळी तिथे सुरक्षा यंत्रणा देखील उपस्थित होत्या. सध्या मदतकार्य वेगाने सुरु असून आतापर्यंत आठ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नदीचा प्रवाह सध्या जास्त असल्यामुळे बचाव कार्य कार्यात अनेक अडचणी येत आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी अनेक लोक उपस्थित होते. त्यांनी देखील कोणत्याही मदतीची वाट न पाहता बचाव कार्याला सुरुवात केली.
अपघातातील काही जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघाता संदर्भात उत्तराखंड पोलिस मुख्यालयाचे प्रवक्ते आयजी नीलेश आनंद भरणे यांनी सांगितले की, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील घोलथिर भागात एक बस अनियंत्रित होऊन अलकनंदा नदीत कोसळली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये 18 जण होते.
#WATCH | Uttarakhand | One person dead, seven injured after an 18-seater bus falls into the Alaknanda river in Gholthir of Rudraprayag district. Teamsof SDRF, Police and Administration conduct search and rescue oeprationd
— ANI (@ANI) June 26, 2025
Video source: Police pic.twitter.com/dgdznAc0ck
या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. सध्या त्यांचा शोध सुरु आहे. त्याठिकाणी झालेल्या पावसामुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सध्या अनेक टीम तिथे दाखल झाल्या आहेत. जिथे अपघात झाला ते ठिकाण खूपच दुर्गम आहे.