Marathi News> भारत
Advertisement

महापौरांचीच कार रस्त्यावरील खड्ड्यात रुतली

मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण पाहायला मिळत आहे. रस्त्यावरील खड्ड्यात महापौरांचीच गाडी अडकल्याचे दिसत आहे.

महापौरांचीच कार रस्त्यावरील खड्ड्यात रुतली

बडोदा : देशात पावसाने चांगला जोर धरला आहे. याचा फटका अनेकांना बसलाय. मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण पाहायला मिळत आहे. गुजरात राज्यात वलसाड, सुरत आणि नवसरी जिल्ह्यात पावसामुळे नुकसान झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यात बडोदा महानगरपालिकेच्या महापौरांचीच गाडी अडकल्याचे दिसत आहे.

बडोदा शहरात पावसाने गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच हजेरी लावली होती. यावेळी बडोद्याच्या महापौर डॉ. जिगिशा सेठ यांची गाडी पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात अडकली. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर महापौरांचीच गाडी खड्यात गेल्याने जोरदार टीका सुरु झाली आहे.  

Read More