Marathi News> भारत
Advertisement

'वंदे भारत'च्या दरात 'बुलेट' प्रवास! हायस्पीड एक्सप्रेसच्या विलंबानंतर रेल्वे मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Bullet Train News: बुलेट ट्रेन कधी धावणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असताना आता रेल्वेकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात येत आहे.   

'वंदे भारत'च्या दरात 'बुलेट' प्रवास! हायस्पीड एक्सप्रेसच्या विलंबानंतर रेल्वे मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Bullet Train News: मुंबई-अहमदाबाद हा महाराष्ट्रातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. आता बुलेट ट्रेन मार्गाच्या कामाला वेग आला आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टचे काम केले जात आहे. 508 कि.मी. लांबीचा हा मुंबई ते अहमदाबाद असा बुलेट ट्रेनचा कॉरीडॉर आहे. मात्र, लवकरच बुलेट ट्रेनसाठीच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

जपानमध्ये तयार होणाऱ्या शिंकान्सेन बुलेट ट्रेनला भारतात येण्यासाठी उशीर होत असल्याने बुलेट ट्रेनसाठीच्या रूळांवर वंदे भारत ट्रेन धावणार आहे. रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टम लेव्हल 2 सिग्नलिंग सिस्टीमसाठी निविदा मागवल्या आहेत. ही यंत्रणा वंदे भारत गाड्यांसाठीही अनुकूल आहेत. त्यामुळं बुलेट ट्रेनच्या मार्गावरुन प्रवाशांना वंदे भारत ट्रेनने प्रवास करता येणार आहे. 

2017 मध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमीपूजन झाले होते. 2026 पर्यंत सुरत-बिलिमोरा दरम्यान बुलेट ट्रेन धावणे अपेक्षित होते. मात्र आता या प्रकल्पासाठी 2030 उजाडणार असण्याची शक्यता आहे. त्यामुळं सुविधा तयार असूनही त्या पडून राहण्यापेक्षा त्याचा वापर वंदे भारत ट्रेनसाठी करता येईल, असा विचार करण्यात येत आहे. त्यावेळी बुलेट ट्रेनसाठी लागणारी सिग्नल यंत्रणा लावत येईल, अशी योजनादेखील आहे. 

कशी असेल बुलेट ट्रेन

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी जपानी बुलेट ट्रेन शिंकनसेन E5 चालवण्याबाबत चर्चा सुरू आहे. ही ट्रेन ताशी 320 किलोमीटर वेगाने धावणार आहे. हा हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर हा भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. हा कॉरिडॉर ताशी 250 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या सेमी-हाय स्पीड ट्रेन्सच्या चाचणीसाठी देखील वापरला जाईल.

बुलेट ट्रेनच्या कामाला गती

बुलेट ट्रेनचा मार्ग 2 किमीच्या जमिनीखालून देखील जाणार आहे. या बोगद्याची खोली जमिनीखाली 25 ते 65 मीटर इतकी असेल.असून बोगद्याचे खोदकाम तीन महाकाय मशीनच्या मदतीने करण्यात येत आहे. हा बोगदाच मुंबईत-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा हा महत्त्वाचा भाग असणार आहे. बीकेसीत पहिला स्टेशन उभारण्याचा काम सुरू झालं मुंबईच्या समुद्रमार्गातून आणि देशातला पहिला 21 किलोमीटरच्या बोगद्याचं काम सध्या सुरू आहे. २१ किलोमीटर बोगद्यातून ही बुलेट ट्रेन धावणार आहे.तर ७ किलोमीटर ही समुद्रखालून जाणार आहे. ह्या बोगद्यासाठी  लागणाऱ्या रिंग ७ हजार ७०० रिंग तयार करण्यात येत आहेत.७७ हजार गोलाकार तयार करण्यात येत आहेत. बीकेसी ते  शिळफाटा दरम्यान २१ किलोमीटर भूमिगत बोगदा असणार आहे. 

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन ... Read more

Read More