Marathi News> भारत
Advertisement

Viral Video : काकांची उडी पाहून सैराटमधील परशाही लाजेल, व्हिडीओ होतोय व्हायरल

मराठी चित्रपट 'सैराट'मध्ये अभिनेता आकाश ठोसरने बोटीमधून पाण्यात मारलेल सूर सर्वांनी पाहिला असावा. असाच सूर व्हिडीओमधील व्यक्ती मारण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत होतं.

Viral Video : काकांची उडी पाहून सैराटमधील परशाही लाजेल, व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पाहताच आपल्या चेहऱ्यावर आपसकूच हसू येतं. काही व्हिडिओ विचार करायला लावणारे असतात, तर काही व्हिडिओ पोट धरून हसवतात. असाच एक सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Funny Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये पोहण्यासाठी विहीरीमध्ये उडी मारताना संबंधित व्यक्तीचा अंदाज चुकल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपट 'सैराट'मध्ये अभिनेता आकाश ठोसरने बोटीमधून पाण्यात मारलेला सूर सर्वांनी पाहिला असावा. असाच सूर व्हिडीओमधील व्यक्ती मारण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत होतं. मात्र काकांचा अंदाज चुकला आणि जे नको व्हायला ते झालं.

नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये- 
एक विहिर दिसत असून त्यामध्ये दोन व्यक्ती बाजूला उभ्या असलेल्या दिसत आहेत. ते सर्व विहीरीमध्ये तलावामध्ये उडी मारणाऱ्या काकांकडे पाहत असतात. काका उडी मारायला जातात तेव्हा ते आधीच पडतात. त्यामुळे ते पाठीवर पडतात आणि तसेच खाली विहिरीमध्ये जातात.  

पाहा व्हिडीओ: 

पाण्यात पडल्यावर ते लगेच सावध होतात आणि बाजूला येतात. चुकून जर त्यांच्या डोक्याला मार लागला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने त्यांना फार काही लागलं नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, प्रजासत्ताक दिनादिवशी एका चिमुकल्याने आपल्या शाळेत केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सध्या ट्रेंडिंगला आहे. ग्रामीण भागातील या चिमुकल्याने लोकशाहीवर दिलेलं भाषण राज्यातील प्रत्येकाच्या व्हाट्सअॅप स्टेटसला झळकताना दिसत आहेत. 

Read More