Marathi News> भारत
Advertisement

Video : 'भारत जोडो यात्रे'दरम्यान Rahul Gandhi कोणाला देत आहेत Flying Kiss?

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधींचे अनेक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत. राहुल गांधी कोणाच्या प्रेमात पडले अशी चर्चा सुरु आहे कारण आहे त्यांचा Flying Kiss करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. 

Video : 'भारत जोडो यात्रे'दरम्यान Rahul Gandhi कोणाला देत आहेत Flying Kiss?

Flying Kiss Video : भारत जोडो यात्रा सुरु झाल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी चांगेलच चर्चेत आहेत. या यात्रेदरम्यान कधी लोकनृत्य करताना, तर कधी क्रिकेट खेळताना तर कधी महिलेला मिठी मारता...राहुल गांधी यांचं यात्रेदरम्यानचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. राहुल गांधी यांचं एक वेगळं रुप या यात्रेदरम्यान दिसून येतं आहे. अशातच राहुल गांधी यांचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओनंतर राहुल गांधी कोणाचा प्रेमात पडले आहे का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. 

राहुल गांधी यांच्या Flying Kiss ची हवा

राहुल गांधी यांचा राजस्थानच्या झालावाडामधील एक व्हिडिओ समोर आला आहे. जेव्हा राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा झालावाडमधून जात असताना भाजप खासदार दुष्यंत सिंह यांच्या कार्यालयासमोर जातं होते. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता राहुल गांधी खूप सारे Flying Kiss देताना दिसतं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल युवराज कोणाला एवढे Flying Kiss देतं आहेत. 
 

हेसुद्धा वाचा - Indian Railways :...म्हणून रेल्वेच्या बोगी वेगवेगळ्या रंगाच्या असतात

 

तर ऐका...


जेव्हा राहुल गांधी भाजप खासदार दुष्यंत सिंह यांच्या कार्यालयासमोर जातं होते तेव्हा भाजप कार्यकर्ते मोदी-मोदी च्या घोषणा देत होते. त्यामुळे राहुल गांधी कार्यालयाच्या गच्चीवर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना पाहून Flying Kiss देतं होते. राहुल गांधी यांचं हे कृत्य पाहून भाजप कार्यकर्ते हसताना दिसतं आहेत. 

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

राहुल गांधी यांचा फ्लाईंग किस करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता राहुल गांधी यांच्यासोबत सचिन पायलट आणि मंत्री रामलाल जाट हे दिसतं आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर Congress या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, 'हे मीरा बाई यांचं राजस्थान आहे. इथे कणा कणात प्रेम आहे आणि राहुल गांधी हे प्रेम आणि अहिंसेचे प्रतिक आहेत.'

Read More