Marathi News> भारत
Advertisement

पंतप्रधानांनी केलं व्हिएतनामच्या अध्यक्षांचं स्वागत

व्हिएतनामचे अध्यक्ष ट्रॅन दाई क्वांग दिल्लीत दाखल झालेत.

पंतप्रधानांनी केलं व्हिएतनामच्या अध्यक्षांचं स्वागत

नवी दिल्ली : व्हिएतनामचे अध्यक्ष ट्रॅन दाई क्वांग दिल्लीत दाखल झालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती कोविंद यांनी त्यांचं स्वागत केलं.. क्वांग यांचा भारताचा तीन दिवसांचा दौरा आहे.

या दौऱ्या दरम्यान त्यांच्यासोबत कलाकार आणि व्यापाऱ्यांचं १८ जणांचं प्रातिनिधिक मंडळही आहे. दौऱ्यादरम्यान क्वांग बोधगयालाही भेट देणार आहेत.

या दौऱ्यात दक्षिण चिनी समुद्र मुद्द्यावर चर्चा होईल. तसंच व्हिएतनाम नेव्हीसाठी काही उपकरणं खरेदी करण्यासाठीही उत्सुक असल्याची माहिती व्हिएतनामच्या राजदुतांनी दिलीय.

Read More