Marathi News> भारत
Advertisement

'माल्याने भारतीय बॅंकाना फसवलं हे बंद डोळ्यांनाही दिसतंय'

कर्जबुडवा व्यावसायिक विजय माल्या प्रकरणाची सुनावणीत माल्याच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. 

 'माल्याने भारतीय बॅंकाना फसवलं हे बंद डोळ्यांनाही दिसतंय'

लंडन : कर्जबुडवा व्यावसायिक विजय माल्या प्रकरणाची सुनावणीत माल्याच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. 

ब्रिटनच्या न्यायाधिशांचे (१६ मार्च) सुनावणीतील वक्तव्य समोर आले आहे. किंगफिशर एअरलाइंन्सला कर्ज देण्यासाठी माल्याने भारतीय बॅंकाचे नियम तोडले हे बंद डोळ्यांनाही दिसतंय, असे ते म्हणाले.

नियमांची पायमल्ली 

 हे प्रकरण गेल्या काही महिन्यांमध्ये अधिक स्पष्ट झाल्याचे लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाच न्यायाधीश एम्मा आर्बथनॉट यांनी सांगितले.

बॅकांनी आपल्याच नियमांची पायमल्ली केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

९ कोटींच कर्ज बुडवलं

६२ वर्षाच्या माल्याला भारताच्या हवाली द्यायचे का ? या प्रकरणावर ही सुनावणी आहे. जेणेकरुन त्याच्यावर मनी लॉंड्रिंग आणि फसवणुकीप्रकरणी सुनावणी होऊ शकेल. ९ कोटी रुपयांचे कर्ज बुडविणे आणि फसवणुकीच्या त्याच्यावर आरोप आहे. 

Read More