Marathi News> भारत
Advertisement

नीरव मोदीनंतर विक्रम कोठारी ५ हजार कोटी घेऊन फरार

पहिल्यांदा ललित मोदी, त्यानंतर विजय माल्या, पुढे नीरव मोदी, त्यानंतर मेहुल चौकसी आणि आता विक्रम कोठारी..

 नीरव मोदीनंतर विक्रम कोठारी ५ हजार कोटी घेऊन फरार

नवी दिल्ली : पहिल्यांदा ललित मोदी, त्यानंतर विजय माल्या, पुढे नीरव मोदी, त्यानंतर मेहुल चौकसी आणि आता विक्रम कोठारी..

बॅंकामधून हजारो कोटी रुपयांचं कर्ज घेऊन पळून जाणाऱ्यांच्या लिस्टमध्ये आणखी एक नाव जोडल गेलंयं.  पेन बनवणारी रोटोमॅक कंपनीचा मालक विक्रम कोठारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व. त्याने देशातील ५ सरकारी बॅंकांमधून साधारण ५ हजार कोटी रुपयांचे कर्ज न चुकवता फरार झाल्याचा आरोप आहे. 

कोण आहे विक्रम कोठारी ? 

कोठारीचा संबंध 'पान पराग'शी आहे. त्याचे वडील मनसुख भाई कोठारी गुजराती परिवाराशी संबंधित आहेत.

त्यांनी १९७३ मध्ये पान मसाल्याचा व्यवसाय सुरू करत पान पराग असे नाव दिले.

१९८३ ते १९८७ दरम्यान पान पराग ही जाहिरात करणारी सर्वात मोठी कंपनी.

कोणाकडून किती कर्ज ?

 कोठारी कानपुरला राहत असून तिथेच घर आणि कार्यालय आहे. त्याने ५ सरकारी बॅंकामधून ५ हजार कोटी रुपये घेतले. २०१० पासून हे कर्ज घेण्यास सुरूवात झाली..

युनियन बॅंकेच्या स्थानिक मॅनेजरनुसार, कोठारीन ५ बॅंकांतून साधारण ३ हजार कोटींचे कर्ज घेतले. याचे कर्ज मिळून २०१८ पर्यंत व्याज मिळून ५ हजार कोटी रुपये झाले. 
 
 इंडियन ओवरसीस बॅंक : १४०० कोटी 
 बॅंक ऑफ इंडिया : १३९५ कोटी 
 बॅंक ऑफ बडोदा : ६०० कोटी 
 युनियन बॅंक : ४८५ कोटी
 इलाहाबाद बॅंक : ३५२ कोटी 
 
याव्यतिरिक्त कोठारीवर ६०० कोटी रुपयांचा चेक बाऊंस प्रकरणाचीही तक्रार आहे. यामध्ये पोलिस त्याची चौकशी करतेय. 

कोठारी देशाबाहेर ?

 कोठारी देशाबाहेर पळाल्याचे म्हटले जात आहे. कानपुर शहरात गेले वर्षभर तो दिसला नसल्याचे कानपुरमधील स्थानिकांनी सांगितले. दरम्यान कोठारी देश सोडून गेला नसल्याची माहिती सुत्रांनी दिलीयं. 

Read More