Water To Cheetahs Viral Video: सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी लोक काय काय करत असतात. अनेकदा साध्या साध्या गोष्टींचेही व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. मात्र असे व्हिडिओ एखाद्याला अडचणीतही आणू शकतात. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला आहे. जंगताली चित्त्यांना पाणी पाजणे एका वन विभागाच्या ड्रायव्हरला चांगलेच भोवल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशमध्ये तहानलेल्या चित्त्यांना वन विभागाचा एक ड्रायव्हर अगदी जवळ जाऊ पाणी पाजत असल्याचा व्हिडीओ इंटरनेटवर सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र अशापद्धतीने वन्य प्राण्यांना पाणी पाल्याने दोन गट पडल्याचं दिसत आहे. एकीकडे अनेकांना या कृतीचे कौतुक केलं आहे तर दुसरीकडे या व्यक्तीने प्राण्यांची आणि स्वत:ची सुरक्षा धोक्यात घातल्याचं लोकांनी म्हटलं आहे. मात्र या साऱ्या प्रकारामुळे व्हिडीओत दिसणारा वन विभागाच्या चालकाच्या नोकरीवर गदा आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही चित्ते झाडाच्या सावलीत झोपलेले दिसत आहेत. त्यावेळी एका ग्रामस्थ हातात पाण्याचा कॅन घेऊन पुढे येतो आणि त्या चित्त्यांसाठी एका ताटात पाणी ओतू लागतो. यानंतर बसलले चित्ते उभे राहतात आणि त्या त्याच्याकडे चालत येतात. व्हिडीओमध्ये हे चित्ते ताटातील पाणी पिताना दिसत आहेत. तर वन विभागाचा चालक असलेली ही व्यक्ती तिथेच उभी राहून व्हिडीओसाठी पोज देताना दिसत आहे. नंतर ही व्यक्ती वन विभागाचा चालक सत्येंद्रनारायन गुर्जर असल्याचं समोर आलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवरील एका गावात काढण्यात आला आहे. अनेकांनी चित्त्यांना पाणी देणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. मात्र वन विभागाने याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, चित्त्यांना पाणी पाजतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, कुनो वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी तडकाफडकी निर्णय घेत सत्यनारायण गुर्जर याला विभागाच्या चालक पदावरून काढून टाकण्यात आले आहे.
Offering water or milk to #cheetahs by villagers is not a good sign for #wildlife conservation. This may lead to dangerous consequences. As usual, the forest is undisturbed.@CMMadhyaPradesh @ntca_india @PMOIndia @KunoNationalPrk @Collectorsheop1 pic.twitter.com/3iIIYbd8Kn
— ajay dubey (@Ajaydubey9) April 5, 2025
"अशा घटनांमधून चित्त्यांना माणसाच्या सहवासाची सवय लागेल आणि ते नागरी वस्तीच्या जवळच राहू लागतील," अशी भीती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच ही घटना मानव आणि वन्य प्राण्यांच्या संघर्षासाठी कारणीभूत ठरु शकते असं सांगण्यात आलं आहे.