Marathi News> भारत
Advertisement

कमी तिथे आम्ही...; पैशांअभावी त्यानं सायकलचीच केली बुलेट, कशी ते पाहा व्हिडीओ

शक्कल लढवून थक्क करणारे कमी होते, त्यात या पठ्ठ्याची भर पडलीये... हौसेला मोल नसतं! पैसे नसले म्हणून काय झालं जुगाड तर आहे.... व्हिडीओ   

कमी तिथे आम्ही...; पैशांअभावी त्यानं सायकलचीच केली बुलेट, कशी ते पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली: भारतात जुगाड करणाऱ्यांची काही कमी नाही. पैशांची कमतरता असली तरी लोक जुगाड करतात. हौसेला मोल नसतं असं म्हणतात तसंच एका व्यक्तीने आपल्या बायकोच्या इच्छेखातर एक जुगाड केला. बायकोला बुलेटवरून फिरायची हौस आली. मात्र त्याच्याकडे बुलेट खरेदी करण्याएवढे पैसे नव्हते. त्याने शक्कल लढवली आणि सायकलाल बुलेट बनवलं.

@upcopmanish नावाच्या व्यक्तीने एक इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत सायकल कम बुलेटवरून जाताना दिसत आहे. या सायकलमागे त्याने लकी द बुलेट एक्स्प्रेस असं लिहिलं आहे. सायकलला बुलेटचा लूक देऊन त्याने आपल्या पत्नीची बुलेटवरून फिरण्याची इच्छा जुगाड वापरून पूर्ण केली. या इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने सायकलचे बुलेटमध्ये रुपांतर केलं आहे.

रॉयल एनफिल्ड बुलेटचे सीट कव्हर आणि मागील भाग अशा प्रकारे फिट केला की पहिल्यांदा हा व्हिडीओ पाहिल्यावर ही बुलेटच वाटेल. एखादा तर पहिल्यांदाच हा व्हिडीओ पाहणाराही एक क्षण फसेल.

बायकोला मागे सारून तो ज्या पद्धतीने 'ड्राइव्ह'वर निघाला ते पाहून नेटकरी त्याचे फॅन झाले आहेत. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या सायकलचे हँडल आणि त्यावर 'लकी द ग्रेट बुलेट एक्सप्रेस' असे लिहिले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by kunal Diwakar (@upcopmanish)

 

Read More