लखनऊ : सोशल मीडियावरती आपल्याला नेहमी वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यामुळे आपले मनोरंजन होते. तर काही व्हिडीओ असे असतात ज्यामुळे आपल्याला माहिती देखील मिळते. परंतु सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ काहीसा वेगळा आहे. हा मुलींमधील भांडणाचा व्हिडीओ आहे. ज्याला सोशल मीडियावरती जोरादार शेअर केले जात आहे. या व्हिडीओबद्दल आम्ही तुम्हाला काही माहिती देणार आहोत.
रस्त्याच्या मधोमध दोन मुलींच्या भांडणाचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील असल्याचे तपासात समोर आले आहे. रस्त्यावर या मुलींनी मारहाण केली. तर इतर लोकं त्या दोघींना वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकरण लखनऊच्या आशियाना भागातील असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणात पीडित मुलीने आरोप केला आहे की, एका मुलाने लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर आपल्या मैत्रिणींना सांगुन तिची मारहाण केली. या हायव्होल्टेज ड्रामानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा तक्रारीनंतर १५ दिवसांनी दाखल करण्यात आला.
पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध लैंगिक छळ आणि अत्याचाराच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अन्य दोन मुलींवरही गुन्हा दाखल केला आहे.
#Lucknow #ViralVideo: बीच सड़क पर आपस में भिड़ीं युवतियां, जमकर हुई मारपीट; वीडियो वायरल
— Zee News (@ZeeNews) October 27, 2021
For More Details: https://t.co/COZYEXly1F pic.twitter.com/rxt8BSDdaB
विशेष म्हणजे, लखनऊमधील मधल्या रस्त्यावरील भांडण पाहिल्यानंतर घटनास्थळी गर्दी जमली आणि लोकांनी व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे तरुणीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३७६, ५०४, ५०६, ३०७, ३५२ आणि ४२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल.