Viral News : सोशल मीडियावर एका लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण हे लग्न एक वधू एक वर असं नाही तर एकाच मंडपात एका वराचं दोन वधूशी लग्न होणार आहे. हे लग्न होतं गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील वासदा तालुक्यातील खानपूर गावात....ही एक आश्चर्यकारक आणि विचित्र लग्नाची गोष्ट आहे. वराचं नाव मेघराजभाई देशमुख असून तो 36 वर्षीय हा सोमवारी 19 मे रोजी एकाच मंडपात तो दोन महिलांशी लग्न करणार आहे, ज्याचे निमंत्रण पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कारण त्यावर दोन वधूंची नावे छापलेली आहेत.
मेघराजभाई हे फलिया परिसरातील रहिवासी आहेत. त्यांना पहिल्यांदा खांडा गावातील काजल गावित यांच्यावर प्रेम झाले. त्यानंतर 2010 मध्ये त्यांचं लग्न झालं. काही वर्षांनी त्यांना केलिया गावातील रेखाबेन गेन यांच्यावर प्रेम झालं आणि 2013 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यानंतर ते दोन्ही महिलांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला.
या काळात त्यांना काजलपासून दोन मुलं आणि रेखापासून एक मुलगा झाला. आता दोन्ही कुटुंबांनी हे नाते स्वीकारले आहे. मेघराजभाई एकाच मंडपात या दोन्ही महिलांशी लग्न करत आहे. हे अनोखे लग्न संपूर्ण विधींसह पार पडणार आहे आणि लोकांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.
हे अनोखे लग्न आदिवासी समुदायाच्या पारंपारिक विधीशी संबंधित आहे. ज्याला "चांदला विधी" किंवा "फुलहार" म्हणतात. या परंपरेनुसार, तरुण आणि तरुणी लग्नापूर्वी पती-पत्नीसारखे एकत्र राहू शकतात. जेव्हा ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतात, तेव्हा ते समाज आणि धर्माच्या रीतिरिवाजांनुसार लग्न करतात. मेघराजभाई, त्याच परंपरेचे पालन करणार आहे. अनेक वर्षांपासून दोन्ही महिलांसोबत एकाच घरात राहत होता आणि आता तो त्यांचं नातं अधिकृत करणार आहेत.
जेव्हा या लग्नाची निमंत्रण पत्रिका बाहेर आली तेव्हा वरासह दोन वधूंची नावे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे कार्ड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. काही लोक याला खऱ्या आणि प्रामाणिक नात्याचे उदाहरण मानत जातं आहे. तर अनेकांना या अनोख्या परंपरेबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मेघराजभाईंना केवळ वांसदाहूनच नाही तर संपूर्ण गुजरातमधून शुभेच्छा आणि फोन येत आहेत. त्यांचे लग्न आता "व्हायरल लग्न" झालं आहे.