Marathi News> भारत
Advertisement

खिडकीसुद्धा हवेत उडाली? Window सीटचं बुकिंग करूनही प्रवाशाची फजिती, विमान कंपनीचं उत्तर डोकं चक्रावणारं

Viral Video : खिडकीसुद्धा हवेत उडाली वाटतं...; Window सीटचं बुकिंग करूनही प्रवाशाची फजिती, VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना....   

खिडकीसुद्धा हवेत उडाली? Window सीटचं बुकिंग करूनही प्रवाशाची फजिती, विमान कंपनीचं उत्तर डोकं चक्रावणारं

Viral Video : विमानानं (Flight) प्रवास करताना अनेकांचच प्राधान्य असतं ते म्हणजे विंडो सीटला अर्थात खिडकीजवळच्या सीटला. विमानातून दिसणारा सूर्योदय असो, सूर्यास्त असो किंवा रात्रीच्या वेळी हवेत कैक फुटांवरून दिसणारी शहरं असो प्रत्येक दृश्य भारावणारच असतं. पण, या विमान प्रवासाच फक्त खिडकीच्या बाजूला असणाऱ्याच सीटवरून हा सारा अनुभव घेता येतो. कारण, मधल्या किंवा अॅलीपाशी असणाऱ्या सीटवरून हा अनुभव फार क्वचितच घेता येतो. 

राहिला मुद्दा विमानप्रवासाचा, तर सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीनं केलेला विमान प्रवास चर्चेचा विषय ठरत आहे. जास्त पैसे भरून, विनवणी करून सर्व परिंनी विमानाच्या प्रवासात विंडो सीट मिळवण्याचा अनेकांचाच प्रयत्न असतो. Pradeep Muthu नावाच्या क्रिकेट समीक्षकानं प्रवासाची अशीच तयारी केली. पण, IndiGo नं केलेला हा प्रवास त्याला फार काही चांगला अनुभव देऊन गेला नाही. 

खिडकीपाशी असणाऱ्या सीटसाठी त्यानं पैसे भरले, तिकीटही मिळालं. त्यानं दिलेल्या माहितीनुसार विमानात गेल्यावर मात्र त्याच्यासमोर भलतंच दृश्य दिसलं, कारण विमान कंपनीनं त्याच्या नावे ज्या सीटची बुकिंग केली होती तिथं खिडकी नव्हतीच. धक्का बसला ना? पण हे खरंय.  "Travel sadness (Travel Parithabangal)" असं कॅप्शन देत आपल्यासोबत नेमकं काय घडलं याचा खुलासा या प्रवाशानं केला. 

हेसुद्धा वाचा : Video : 'दिमाग किधर है तेरा...' चालू सामन्यातच रोहित शर्मानं हर्षित राणाला झापलं 

X च्या माध्यमातून प्रदीप मुथू यानं इंडिगोच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटचा उल्लेख करत घडला प्रकार समोर आणला. 'विंडो सीट आहे... पण, खिडकी कुठंय?' असा सवाल त्यानं केला. पाहता पाहता काही तासांत त्याचं हे ट्विट व्हायरल झालं आणि शेवटी विमान कंपनीनंही यावर रिप्लाय दिला. 'आम्हाला तुमची काळजी वाटतेय. कृपया तुमच्या विमान प्रवासाचा सविस्तर तपशील (PNR) शेअर करा म्हणजे आम्ही तुम्ही मदत करू शकू', असं उत्तर त्याला मिळालं. 

ट्विटरवर या 'अनोख्या' प्रवासाच्या अनुभवानं नेटकरी भारावले आणि त्यांनी तिथं तऱ्हेवाईक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी तर, स्वानुभवातून हे असं काहीतरी अनुभवल्याची प्रतिक्रियासुद्धा दिली. तुम्हाला विमान प्रवासात असा काही अनुभव आला आहे का? 

Read More