Marathi News> भारत
Advertisement

Viral Video : अजब लग्नाची गजब गोष्ट! दोन सारख्या चेहऱ्यांचा भावांचं जुळ्या बहिणींशी लग्न, ‘घरी गेल्यावर गोंधळून...’

Viral Video : एकसारखे दिसणाऱ्या दोन जुळा भावांचं दोन जुळ्या बहिणींशी लग्न झालं आहे. या अनोखा लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘घरी गेल्यावर गोंधळून...’ नेमकं काय ते जाणून घ्या.     

Viral Video : अजब लग्नाची गजब गोष्ट! दोन सारख्या चेहऱ्यांचा भावांचं जुळ्या बहिणींशी लग्न, ‘घरी गेल्यावर गोंधळून...’

Viral Video : आपल्या आजूबाजूला आपण जुळी मुलं पाहिली आहेत. दोन भाऊ, दोन बहिणी तर कधी कधी एक मुलगा एक मुलगी अशी जुळी मुलं असतात. यातही प्रत्येक जुळी मुलं ही एकसारखी दिसत नाहीत. पण सध्या सोशल मीडियावर सारख्या दिसणाऱ्या जुळ्या बहिणींच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या जुळ्या बहिणींचे पतीही त्यांच्यासारखे जुळी आहेत. त्यामुळे दोन एकसारखा दिसणाऱ्या वधू आणि एकसारख्या पोशाखातील वर पाहून प्रत्येक जण चक्रावत आहेत. 

अजब लग्नाची गजब गोष्ट! 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा केरळमधील आहे. या व्हिडीओमधील जुळ्या बहिणीचं नाव भाग्यलक्ष्मी आणि धनलक्ष्मी आहे. हा व्हिडीओ म्हणजे कुठल्या पिक्चरचा सीन नाही तर खऱ्याखुऱ्या आयुष्यातील हा आनंदी प्रसंग आहे. केरळमध्ये जुळ्या बहिणींचं लग्न जुळ्या भावांशी झालंय. (Viral Video Amazing story of a strange wedding Two brothers with identical faces marry twin sisters)

भाग्यलक्ष्मी आणि धनलक्ष्मी या अगदी सारख्या दिसतात. जर कोणी त्यांना एकत्र पाहिले तर त्यांना ओळखणे कठीण होतं. सर्वात गंमतीशीर गोष्ट म्हणजे त्यांना असे जीवनसाथी देखील सापडले जे जुळे आहेत आणि अगदी एकसारखे दिसतात. लग्नात, दोन्ही वधू कांजीवरम साड्या आणि सोन्याच्या दागिन्यांमध्ये खूप सुंदर दिसत होत्या, तर वर पारंपारिक पोशाखात खूप देखणा दिसत होते.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लोक यावर मजेदार कमेंट करत आहेत. नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिलंय, 'हा निसर्गाचा चमत्कार आहे! खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.' 'त्यांच्या लग्नात खूप गुंतागुंत असेल,' असा एकाने विनोद केला. तिसऱ्याने लिहिलंय, 'लवकरच त्यांना मुले होतील आणि ते खरे भाऊ देखील होतील.' चौथ्या व्यक्तीने लिहिलंय की, 'गोंधळ टाळण्यासाठी वेगवेगळ्या केसांच्या स्टाईल असायला हव्यात.' दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिलंय, 'त्यांनी घरी गोंधळून जाऊ नये.' या व्हायरल व्हिडीओवर अशा अनेक मजेदार कमेंट्स आणि सूचना केल्या आहेत. 

Read More