Marathi News> भारत
Advertisement

वधू-वर दोघंही बॉडीबिल्डर, मग काय स्टेजवर सुरु झाला 'हुप्पा हुय्या' बघा Video

लग्न समारंभात वधू-वराचा डान्स किंवा फार तर त्यांच्या मित्रांनी केलेल्या करामती तुम्ही आतापर्यंत पाहिल्या असतील. पण भर स्टेजवर वधू आणि वरात स्पर्धा आणि तीही व्यायाम करण्याची पाहिली आहे का, पाहा Video  

वधू-वर दोघंही बॉडीबिल्डर, मग काय स्टेजवर सुरु झाला 'हुप्पा हुय्या' बघा Video

Wedding Viral Video : लग्न म्हणजे दोन जीवांचे आणि मनाचं मिलन. आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण कायमचा लक्षात रहावा यासाठी वधू आणि वर या दोघांचेही प्रयत्न असतात.  लग्न समारंभातील असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्न समारंभात वधू-वराचे कपडे असोत, कि त्यांचा डान्स असो किंवा वधू-वराच्या मित्रांनी केलेल्या करामती असोत याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर झपाटयाने व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आहे.

काय आहे व्हायरल व्हिडिओत?
वधू आणि वर दोघंही बॉडी बिल्डर आहेत. मग काय लग्नाच्या दिवशी या दोघांमध्ये स्टेजवर पॉवर लिफ्टिंगची स्पर्धाच सुरु झाली. लग्नाला उपस्थित असणाऱ्या लोकांनीही टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिलं. वधू आणि वर दोघांनीही स्टेजवर एन्ट्री घेताच एकमेकांसमोर उभे ठाकले. दोघांनीही एकामागोमाग एक वजन उचलण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे दोघांच्या चेहऱ्यावर जराही थकवा जाणवत नाही. कॅमेरामननेही हा अनोखा क्षण आपल्या कॅमेरात कैद केला आहे. 

वधू-वराने मारले स्क्वाट्स
पॉवरलिफ्टिंगनंतर वधू-वर तिथेच थांबले नाहीत तर त्यांना यानंतर स्क्वाट्सही मारले. व्हिडिओत आपण बघू शकतो पॉवरलिफ्टिंगनंतर वधू वराला इशारा करते आणि दोघंही स्क्वाट्स मारायला सुरुवात करतात. लग्नाच्या कपड्यात दोघांनी केलेल्या व्यायामाचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Cheston Uy (@chestonuy)

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ chestonuy नावाच्या यूजरने शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला तब्बल 2 लाख लोकांनी लाईक केलं आहे. तर शेकडो युजर्सने प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

Read More