Marathi News> भारत
Advertisement

थरकाप उडवणारा व्हिडीओ....वळूनं व्यक्तीला जमिनीवर आपटलं आणि....Video Viral

भर रस्त्यात वळू आला आणि त्यानं धुमाकूळ घालत जे केलंय ते पाहून भीतीनं थरथराट भरेल   

थरकाप उडवणारा व्हिडीओ....वळूनं व्यक्तीला जमिनीवर आपटलं आणि....Video Viral

मुंबई : असे अनेक प्राणी आहेत, ज्यांच्या रागाचा सामना आपण करू शकत नाही. अशात एखादा साधा व्यक्ती त्यांच्या समोर आला, तर त्याची काही खैर नाही. आता सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भीतीनं थरथराट भरेल असा व्हिडीओ सध्या फार चर्चेत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक वळू रस्त्यावर उभा असलेला दिसत आहे. 

वळू रस्त्यावर शांत उभा असलेला दिसत आहे. पण जेव्हा गेट मधून एक व्यक्ती बाहेर येताना दिसत आहे. या व्यक्तीला बाहेर येताना पाहाताचं वळू त्या व्यक्ती जवळ जातो, त्या व्यक्तीला शिंगावर उचलतो आणि जमिनीवर आपटतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्या व्यक्तीला वळू आपल्याजवळ येत असल्याचं कळालं पण तेव्हा उशीर झालेला असतो. शिंगावर उचलल्यानंतर वळू त्या व्यक्तीला जमिनीवर पाडून त्याच्या अंगावर चढूनही हल्ला करतो. 

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्यक्ती स्वतःवा वाचवण्याचा प्रचंड प्रयत्न करतो. पण वळूपुढे तो अपयशी ठरतो. आतापर्यंत लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. तर 70 हजारहून अधिकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. 

Read More