Marathi News> भारत
Advertisement

OMG! डान्स करताना जमीन खचून दुर्घटना, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण

लग्नाच्या पार्टीत असे नाचले की जमीनच खचली, विश्वास बसत नाही तर पाहा हा व्हिडीओ 

OMG! डान्स करताना जमीन खचून दुर्घटना, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण

मुंबई : इंटरनेट मनोरंजनाचं उत्तम साधन आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एका लग्नातील व्हिडीओ चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही मिनिटांसाठी तुमच्याही अंगावर काटा येईल. 

या व्हिडीओमध्ये पाहू शकता की सगळेजण आनंदात डान्स करत आहेत. पार्टी मस्त सुरू आहे पण अचानक एक मोठी दुर्घटना घडते. पायाखालची जमीन खचते आणि मोठी दुर्घटना घडते. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. 

जमीन खचल्याने डान्स करणारे खाली पडतात. ह्या व्हिडीओला विनोदी रुप देण्यात आलं असलं तरी हा व्हिडीओ पाहून एक क्षण अंगावर काटा येतो. हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मी तुझ्या लग्नात जमीन खचेल एवढा जबरदस्त डान्स करेन असं म्हटलं आहे. 

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका पॉईंटला काही युजर्सना आपलं हसूही आवरलं नाही. काही युजर्सनी आपल्या मित्र-मैत्रिणींना हा व्हिडीओ टॅग केला आहे. हा व्हिडीओ 53 हजारहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. तर 8 लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ammu_kushwaha (@ammu__rx100)

Read More