Marathi News> भारत
Advertisement

सावधान! जत्रेतल्या झुल्यावर बसताय?

छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (viral video) जत्रेतला झुला दिसतोय.   

सावधान! जत्रेतल्या झुल्यावर बसताय?

Viral Video : जत्रेत झुल्यावर बसत असाल तर थांबा. आज आम्ही दाखवत असलेला व्हीडिओ (viral video) पाहा आणि सावध व्हा. जत्रेत जास्तीचे पैसे कमावण्याच्या नादात झुलेवाले कसे लोकांच्या जीवाशी खेळतात ते या व्हीडिओतून स्पष्ट होतंय. नक्की काय घडलंय. चला पाहुयात. जत्रेत तुम्ही पाळण्यात बसणार असाल तर हा व्हीडिओ पाहा. छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जत्रेतला झुला दिसतोय. (viral video fact check 4 people fell from the overloaded swing)

हा झुला मोठ्या नावेसारखा दिसतोय. झुल्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक बसलेयत. झुला ओव्हरलोड झाल्याने लोक उभे राहिलेत. दोन तीन वेळा झुला झुलल्यानंतर उभे असलेल्यांचा बॅलन्स बिघडला. आणि चौघेजण धाडकन खाली कोसळले. आता पुन्हा एकदा पाहा. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना घडलीय. 

झुला झुलत असताना 4 जण खाली कोसळले. चौघे खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाली. यांचं नशीब बलवत्तर म्हणून मोठ्या संकटातून हे थोडक्यात बचावले नाहीतर इथे मोठा अनर्थ घडला असता. या झुल्याच्या मालकाने जास्त पैसे कमावण्याच्या नादात क्षमतेपेक्षा जास्त लोकांना झुल्यात बसवलं.पण, अशी चूक झुल्यात बसणाऱ्यांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे तुम्ही जर जत्रेत झुल्यात बसणार असाल तर काळजी घ्या. 

Read More