Marathi News> भारत
Advertisement

Viral Video: नवऱ्या मुलाने लग्नात असा डान्स केला, ते पाहून नवरी अशी काही लाजली की...

कोरोनाचा काळ आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध आहेत. गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन असूनही विवाहसोहळे सुरूच आहेत.  

Viral Video: नवऱ्या मुलाने लग्नात असा डान्स केला, ते पाहून नवरी अशी काही लाजली की...

मुंबई : कोरोनाचा काळ आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध आहेत. गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन असूनही विवाहसोहळे सुरूच आहेत. काही लोकांनी छुप्या पद्धतीने लग्न केले तर काही लोक लॉकडाउन उघडण्यापर्यंत थांबले. तथापि, लॉकडाऊन उठवल्यानंतर अनेकांनी लग्न करण्यास सुरुवात केली. त्यांनी आणखी थोडा आनंद घेतला. एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वर आपल्या वधूला पाहून खूप आनंदी झाला आणि त्यांने मंडपात डान्स सुरु केला.

आपल्याच लग्नात वराचा जोरदार डान्स

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, नवरा मुलागा आपल्या होणाऱ्या वधू पाहून खूप आनंदीत झाला. त्याने उत्साहाच्या भरात वधुसमोर डान्स करु लागला. अनपेक्षित डान्स पाहून वधुही लाजून चूर झाली. नवरा वधुसमोर मजेदार पद्धतीने नाचू लागला. आपले दोन्ही हात उंचावून 'धीर धीरे नाच ..' या गुजराती गाण्यावर तो गंमतीने नाचत होता. वराची असे नृत्य पाहिल्यानंतर वधुसुद्धा लाजली आणि ती हसू लागली.

नृत्य पाहून वधुसुद्धा लाजली

तिथे उभे असलेले लोक तिला नृत्य करण्यास देखील सांगत आहेत. पण ती इतकी लाजली की ते मोकळेपणी नाचू शकलेली नाही. वराच्या डान्सनंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक म्हणाले, 'मौज कर दी बेटा.' हा व्हिडिओ 2 लाखाहून अधिक लोकांना पसंतीला पडला आहे.

Read More