आसाममधील मणिक याच्यासाठी आजचा दिवस फार आनंदाचा होता. कारण त्याला मागील अनेक दिवसांपासून हवं असलेलं स्वातंत्र्य अखेर मिळालं होतं. आपला हा आनंद साजरा करण्यासाठी त्याने अनोखा मार्ग स्विकारला. त्याने चक्क दुधाने आंघोळ केली. आसामच्या खालच्या भागातील नलबारी जिल्ह्यातील रहिवासी माणिक अलीचं दुधाने आंघोळ करण्याचं कारण ऐकल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. घटस्फोटासह पत्नीपासून कायदेशीररित्या वेगळे झाल्यानंतर दुधाने स्नान केले.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत माणिक अली आपल्या घराबाहेर उभा असल्याचं दिसत आहे. यादरम्यान तो जीन्स आणि बनियानमध्ये आहे. प्लास्टिक शीटवर उभा असलेल्या माणिकसमोर दुधाने भरलेल्या चार बादल्या आहेत. तो एकामागोमाग एक त्यातून दूध घेत आंघोळ करत आपल्या घटस्फोटाचं सेलिब्रेशन करतो.
Assam Man Milk Bath After Divorce With His Wife #assamman #milkbath #husbandandwife #divorce #viralvídeo #latestnews #andhraprabha #andhraprabhanews pic.twitter.com/Mkly7QO7iY
— Andhra Prabha News (@andhraprabha_) July 13, 2025
माणिक अली याने आनंद साजरा करताना कॅमेऱ्यात कैद केला. तसंच आपण आजपासून मुक्त झालो आहोत असं जाहीर करुन टाकतो. हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. त्याने सांगितलं आहे की, "ती सतत आपल्या प्रियकरासह पळून जात होती. मी कुटुंबाच्या भल्यासाठी, शांतता राहावी यासाठी शांत राहणं पसंत केलं होतं" .
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, माणिकची पत्नी यापूर्वी किमान दोनदा पळून गेली होती आणि त्यानंतर त्यांनी परस्पर सहमतीने कायदेशीररित्या पती-पत्नीचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला. "माझ्या वकिलाने काल मला घटस्फोट झाल्याचं सांगितले. म्हणून, आज मी माझ्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यासाठी दुधात आंघोळ करत आहे," असं त्याने व्हायरल व्हिडिओमध्ये म्हटले आहे.