Marathi News> भारत
Advertisement

सप्तपदी घेताना नवरा-नवरीने काय केलं? ट्रोलर्स म्हणाले, 'हे विसरू नका'

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की पाहा

सप्तपदी घेताना नवरा-नवरीने काय केलं? ट्रोलर्स म्हणाले, 'हे  विसरू नका'

मुंबई : लग्न, लग्नात होणाऱ्या  विधी इत्यादी गोष्टींना फार महत्त्व दिलं जातं. पण आता लग्नांमध्ये  संस्कृती नाही तर आठवणींना जास्त महत्त्व दिलं जातं. लग्नामध्ये सर्वात जास्त महत्त्व सप्तपदींना असतं. पण एका जोडप्याने तर सप्तपदी घेताना चक्क डान्स केला आहे. आता या जोडप्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफाम व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवरा आणि नवरी सप्तपदी घेताना डान्स करताना दिसत आहेत. या जोडप्याचा व्हायरल होत असलेला हा डान्स काहींना  फार आवडला. तर काहींनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ वेदांत बिर्लाने ट्विटरवर शेअर केला आहे.

 वेदांत बिर्ला यांनी व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये,  'हे लग्न आहे की संस्कारांचा त्याग? हे विसरू नका की आपण जगात फक्त आपल्या संस्कृती आणि विधीमुळे आदरणीय आहात.' असं लिहिलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Read More