पंजाबच्या मोहाली येथे पालिकेच्या मेडिकल टीमने चिकनच्या दुकानांवर छापा मारुन तब्बल 60 किलो दुर्गंधीयुक्त चिकन जप्त केलं आहे. टीमने हे चिकन नष्क करत संबंधित दुकानांना दंड ठोठावला आहे. धक्कादायक म्हणजे मोमो बनवणाऱ्या एका फॅक्टरीच्या फ्रिजमधून कुत्र्याचं कापलेलं शीर जप्त करण्यात आलं आहे. या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोहालीचे सहाय्यक अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. अमृत वारिंग म्हणाले की, फॅक्टरी चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनाही कळवण्यात आलं आहे. वितरणासाठी मोमो आणि स्प्रिंग रोल बनवणाऱ्या फॅक्टरीची सध्या तपासणी केली जात आहे. जेणेकरुन कुत्र्याचं मांस वापरलं जात होतं की नव्हतं याची माहिती मिळावी. कुत्र्याच्या डोक्याप्रमाणे दिसणारं मांस तपासणीसाठी प्राण्यांच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तसंच मोमो, स्प्रिंग रोल आणि चटणीचे नमुने पाठवण्यात आले आहेत.
Momos factory pic.twitter.com/DnWCz1AlwP
— Mohini Of Investing (@MohiniWealth) March 17, 2025
घटनास्थळी गोठलेले चिरलेले मांस आणि क्रशर मशीन देखील आढळून आले. रविवारी प्रशासनाला या प्रकरणाची माहिती देण्यात आली. स्थानिकांच्या तक्रारींनंतर रविवार आणि सोमवारी मोहाली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मटौर (मोहाली) आणि आसपासच्या भागात ही कारवाई केली. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या दोन्ही ठिकाणांना डीएचओने भेट दिली आणि त्यांना कुजलेल्या भाज्या, फास्ट फूड आणि शिजवलेले अन्न आढळले.
Billa (Tomcat) head used for making Chicken Momos? Another video from Mataur goes viral, where a person alleges that a tomcat’s head is being used instead of chicken, and non-veg momos are made from this flesh. Another media report suggests that it was actually a dog’s head. The… https://t.co/PKYYHRPZgz pic.twitter.com/r0wbe02N9B
— Gagandeep Singh (@Gagan4344) March 18, 2025
या संदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले आहेत. याशिवाय, नोंदणी नसलेल्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. ही फॅक्टरी चालवणारे विक्रेते नेपाळचे आहेत. छापा टाकताना स्थानिक लोक घटनास्थळी जमले होते.
तथापि, कारखान्यातील कामगारांनी सापडलेले प्राण्याचे डोके मोमो बनवण्यासाठी वापरले जात नव्हते तर ते त्यांचे मांस होते जे ते खातात असा दावा केला आहे. मोहाली सिव्हिल सर्जन डॉ. संगीता जैना म्हणाल्या की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.