Marathi News> भारत
Advertisement

कॅच पकडण्याच्या नादात खिडकीतून गेला तोल... तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडीओ

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपल्या घराच्या खिडकीत उभा असतो.

कॅच पकडण्याच्या नादात खिडकीतून गेला तोल... तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यामुळे आपलं मनोरंजन होतं. हे व्हिडीओ कधी मजेदार असतात, तर कधी एखाद्या अशा घटनेचे असतात जे तुमच्या हृदयाचा ठोका चुकवतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना धक्का बसत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण कॅच पकडायला जातो आणि खिडकीतून खाली पडतो. या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपल्या घराच्या खिडकीत उभा असतो. तो इमारतीच्या पहिल्या मजल्यावर उभा असतो. तेव्हा एक व्यक्ती लांबून त्याच्याकडे बॉल फेकतो आणि तो बॉल पकडण्यासाठी खिडकीत पुढे येतो.

तो बॉल पकडण्याच्या नादात या तरुणाचा तोल जातो आणि तो खिडकीतून खाली पडतो. नशीबाने हा तरुण जास्त उंचावर उभा नसतो. ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली नाही.

परंतु तो व्यक्ती ज्या पद्धतीने खाली पडतो, तो क्षण मात्र सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकवतो.

हा व्हिडीओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, हा तरुण अगदी मजेदार पद्धतीने खाली पडला आहे. हा तरुण तोल गेल्यानंतर खालच्या मजल्याच्या खिडकीतून पुन्हा आतल्या बाजूला जाऊन पडतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल की, त्याच्या कमरेला दुखापत झाली असावी परंतु त्याला गंभीर असं लागलेलं नाही.

हा व्हिडीओ @ViralPosts5 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. 14 सेकंदाच्या या व्हिडीओला 15 हजारापेक्षाही जास्त व्ह्युज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

Read More