Marathi News> भारत
Advertisement

21 व्या शतकात नवरदेवाचा स्वयंवर....'शिव धनुष्य' तोडल्याचा व्हिडीओ व्हायरल

कलयुगातही बिहारमध्ये असा एक स्वयंवर पार पडला आहे. जो थोडा वेगळा आहे.

21 व्या शतकात नवरदेवाचा स्वयंवर....'शिव धनुष्य' तोडल्याचा व्हिडीओ व्हायरल

बिहार : आपल्या देशातील लोकं कधी काय करतील याचा काही नेम नाही. त्यात भारतात लग्नांमध्ये प्रत्येक भागात वेगवेगळ्या चालीरिती असतात. त्यात काही अशा विधी असतात, ज्या आपल्यासाठी नवीन असतात, तर काही खूप विनोदी चालीरिती असतात. आपण आपल्या हिंदू पुराणातील कहाण्या ऐकल्या आहेत, ज्यामध्ये स्वयंवर पार पडले होते. त्यात तुम्हाला भगवान रामाच्या स्वयंवराबद्दल महितच असेल, ज्यामध्ये भगवंतांनी धनुष्य तोडून माता सीतेसोबत लग्न केलं होतं. परंतु कलयुगातही बिहारमध्ये असा एक स्वयंवर पार पडला आहे. जो थोडा वेगळा आहे.

सात फेऱ्यांपूर्वी स्वयंवर

कलयुगात वरासाठी स्वयंवर आयोजित करण्यात आला होता. वरांनी प्रथम शिव धनुष तोडला, मग वधूंनी वराला वरमाळा घातल्या. वराला वरमाळा घालताच लग्नाच्या मंडपामध्ये लोकांनी टाळ्या वाजवल्या. बिहारमधील सारण जिल्ह्यातील हे अनोखा विवाह पाहून लोकांना सतयुगाचे रामायण आठवलं. त्यामुळे हे लग्न सध्या चर्चेत आहे.

देवी सीतेच्या स्वयंवरात मोठे योद्धा उपस्थित होते. त्यामुळे जो योद्धा शिव धनुष्य मोडू शकेल, त्याच्याशीच वधूचे लग्न केले जायचे किंवा जो वर दिलेली अट पूर्ण करेल त्याच्यासोबतच वधू लग्न करायची. परंतु कलियुगाच्या या लग्नात वर तर आधीच निश्चित झाला होता. म्हणजेच मुलगी आणि मुलाच्या घरच्यांनी एकमेकांशी बोलून वर-वधूचे लग्न ठरवले होते. परंतु तरीही हे स्वयंवर केले गेले.

बिहारच्या या विचित्र विवाहामध्ये वराने शिव धनुष तोडण्याची परंपरा पार पाडली. मग माळा घालून संपूर्ण रितीने विवाह पूर्ण झाला. हा विवाह सोहळा सोनपूर ब्लॉक अंतर्गत सबलपूर पूर्व येथे आयोजित करण्यात आला होता. स्वयंवरचे हे अनोखे लग्न पाहण्यासाठी लोकंची ही गर्दी जमली होती. परंतु यामुळे कोव्हिडच्या  नियमांचे मात्र उल्लंघन झाले.

Read More