Youngster bike stunt with kid : थोरेमोठे म्हणायचे, वेग जितका थरारक असतो तितकाच तो प्राणघातक देखील असतो. अनेकदा वेगाच्या भरात माणसाला जीव देखील गमवावा लागतो. देशात रस्ते अपघाताचं प्रमाण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. वाहन चालवताना केलेला निश्काळजीपणा याला अनेकदा जबाबदार असतो. अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Viral Video of Dangerous Stunt) व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. एका तरुणाने चक्क एका लहान मुलाला गाडीवर (Youngster bike stunt with kid) बसवून स्टंट केलाय. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक तरुण आपल्या गाडीवर एका मोकळ्या रस्त्यावरून फिरतोय. यावेळी तो सरळ गाडी चालवत नसून तो स्टंट मारताना दिसत आहे. कधी गाडीवर उभा राहतो, तर कधी गाडीला झुलवतो. समोरून बैल गेला तरी देखील तो गाडीवर स्टंट मारत राहिला. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती समोर येत आहे.
एका निष्पाप मुलाला बाईकवर बसवून धोकादायक स्टंट करणाऱ्या या माणसाला लवकर धडा शिकवा, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसणाऱ्या बाईकचा नंबर सीतापूरचा असल्याचं दिसत आहे. त्यामुळे तरुणावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला असून तरुणावर कारवाई व्हावी, अशी मागणी युपी पोलिसांना टॅग करून केली जात आहे.
एक मासूम बच्चे को बाइक पर बैठाकर खतरनाक स्टंट करने वाले इस मनबढ़ शख्स को त्वरित गति से सबक सिखाएं कृपया @dgpup @Uppolice @UPPViralCheck
— Gyanendra Shukla (@gyanu999) July 17, 2024
वायरल वीडियो में नजर आ रही बाइक का नंबर सीतापुर का नजर आ रहा है! pic.twitter.com/bKVqHYVzMJ
दरम्यान, सध्या पाऊस जास्त असल्याने अनेक ठिकाणहून अपघाताचे व्हिडीओ समोर येत आहेत. दोन दिवसापूर्वी शहापूर तालुक्यातील नवीन कसारा घाटात 6 ते 7 वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. पावसात रस्ता निसरडा होत असल्याने वाहनचालकांनी गाडी चालवताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.