Marathi News> भारत
Advertisement

Viral video : हा मोर की कबूतर? व्हिडीओ पाहा आणि तुम्हीच ठरवा

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे कोणालाच माहिती नसते.

Viral video : हा मोर की कबूतर? व्हिडीओ पाहा आणि तुम्हीच ठरवा

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे कोणालाच माहिती नसते. अचानक एखादी गोष्ट कोणीतरी शेअर करतं आणि तिच्यातील एखाद्या युनिक गोष्टीमुळे ते सर्वत्र शेअर केली जाते. ज्यामुळे ती सर्वत्र व्हायरल होते. एखादी बातमी असो, फोटो असो किंवा एखादा व्हिडीओ त्यात काही नवीन असलं की लोकं लगेचच त्याला व्हायरल करतात. काही गोष्टी खूप मजेदार असतात, जे पाहून लोकांना आनंद होते. त्याचवेळी, काही गोष्टी लोकांना आश्चर्य करणारी किंवा गोंधळात टाकणारी असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ असा आहे की, तुम्ही तो पाहून नक्कीच पेचात पडाल.

हा या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलंत तर तुम्हाला हा पक्षी नक्की कोणता असा प्रश्न पडेल? कारण हा पक्षी कधी मोर दिसत आहे, तर कधी कबूतर. ज्यामुळे हा नक्की काय प्रकार आहे हे लोकांना काही कळत नाही आहे.

जेव्हा एखादा मोर नाचत असतो किंवा आनंदी होतो तेव्हा तो आपले पंख पसरवतो, हे दृष्य फारच मनमोहक असते त्यामुळे आपण ते आपल्या फोनमध्ये लगेच कैद करतो. असाच एक व्हिडीओ एका व्यक्तीने शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये असे काहीतरी आहे ज्यांने लोकांना क्षणभर आश्चर्यचकित केले. खरेतर यामध्ये, कबूतर नाचताना मोरासारखे पंख पसरायचा प्रयत्न करीत आहे. ज्यामुळे लोक संभ्रमित होत आहेत.

आपण व्हिडीओ पाहून गोंधळात पडू शकतात. कारण, कबूतर ज्या प्रकारे नाचत आहे, त्यामुळे तो मोरच आहे की, काय असे वाटत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ idiotic_sperm नावाच्या अकाउंटवरुन इंस्टाग्रामवर शेअर केला गेला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्याचवेळी, लोकं या व्हिडीओवर खूप मजेदार प्रतिक्रिया देखील देत आहेत. या व्हिडीओचा आनंद घेताना एका यूझरने लिहिले की, 'लहानपणापासूनच याला मोर बनायचे होते, परंतु पालकांच्या दबावामुळे तो कबूतर बनला.'

तर दुसऱ्या एका यूझरने लिहिले, 'मोराचा पुनर्जन्म झाला आहे'. तर तिसऱ्याने लिहिले की 'हा व्हिडीओ पाहून मला खूप आश्चर्य वाटले'.

Read More